---Advertisement---

अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनमध्ये भारत खेळणार? ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ठरणार निर्णायक

On: रविवार, डिसेंबर 25, 2022 4:21 PM
Team-India
---Advertisement---

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला वनडे मालिकेत पराभव स्वीकारावा लागला, पण कसोटी मालिकेत त्यांनी यजमान बांगलादेश संघाला क्लीन स्वीप दिला. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने 188 धावांनी जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी 3 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचेल, अशी परिस्थिती तयार झालीआहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा दुसरा सामना मिरपूरमध्ये 22 ते 25 डिसेंबर दरम्यान खेळला गेला. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असून फलंदाजांना याठिकाणी खास कामगिरी करता आली नाही. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सामन्याच्या चौथ्या नाबाद 71 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय लंघावा या मालिका विजयाचा मोठा फायदा मिळणार आहे. भारत सध्या अजिंक्यपद स्पर्धा 2021 – 2023 च्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संघ अंतिम सामन्यात पोहोचण्याची आशा वाढली –
अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिका पाहता भारत अंतिम सामन्यात पोहोचेल, अशी आशा सर्वांनाच आहे. मात्र यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 4-0 किंवा 3-0 असा विजय मिळवावा लागणार आहे. जर या मालिकेत भारताने दोन कसोटी सामने गमावले, तर संघाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही कसोटी मालिका 9 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये सुरू होईल.

एवढेच नाही, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकन संघाच्या प्रदर्शनावर देखील भारताची पुढची वाटचाल अवलंबून असणार आहे. यात चांगली बाब हीच आहे की, भारत सध्या गुणतालिकेत इतर संघांच्या तुलनेत खूप पुढे आहे. ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असून भारत त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर –
अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाने 13 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेतील दुसरा संघ भारत आहे, ज्याने 14 सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीनंतर यादीत नाव आहे दक्षिण आफ्रिका संघाचे. चौथ्या क्रमांकावर श्रीलंका संघ आहे. पाचव्या क्रमांकावर इंग्लंड, सहाव्या क्रमांकावर वेस्ट इंडीज आणि सातव्या क्रमांकावर पाकिस्तान संघ आहे. यादीत आठवा क्रमांक न्यूझीलंडचा असून दहाव्या क्रमांकावर बांगालदेश आहे.  (After winning the Test series against Bangladesh, India’s hopes of reaching the final of the Test Championship have increased)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी
आतल्या गोटातील बातमी! मालिका विजयानंतर कर्णधार राहुल म्हणाला, ‘खोटं बोलणार नाही, ड्रेसिंग रूममध्ये…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---