भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात (6 डिसेंबर) पासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. याआधी, पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला होता. तर पहिल्या डावात भारतीय संघ केवळ 150 धावांत गारद झाला होता. तरीही भारतीय संघाने हा सामना सहज जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता ॲडलेड कसोटीपूर्वी यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने (Alex Carey) याबाबत चर्चा केली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना ॲलेक्स कॅरी (Alex Carey) म्हणाला, “तो (बुमराह) निश्चितच महान गोलंदाज आहे. गेली अनेक वर्षे तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आमचे फलंदाजही जागतिक दर्जाचे आहेत आणि नेहमी उपाय शोधण्याचे मार्ग शोधतात. आम्ही बुमराहच्या गोलंदाजीचे मूल्यांकन केले आहे. त्याच्या पहिल्या दुसऱ्या स्पेलचा सामना करण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी आशा आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने कसे प्रतिआक्रमण केले हे आपण पाहिले.”
पुढे बोलताना ॲलेक्स कॅरी म्हणाला, “आम्हाला आमच्या फलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. केवळ बुमराहलाच नाही तर त्याच्या इतर गोलंदाजांचाही सामना करण्याचा मार्ग आम्ही शोधू. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात काही नवीन गोलंदाजांसह प्रवेश केला आणि त्यांनीही चांगली गोलंदाजी केली.”
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 2018 साली कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 41 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 79 डावात गोलंदाजी करताना 181 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 20.06 राहिली आहे, तर इकाॅमाॅमी रेट 2.75 राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; दुसऱ्या कसोटीपूर्वी माजी दिग्गजाचा ऑस्ट्रेलियाला सल्ला! म्हणाला…
SMAT; आरसीबीच्या 2 धुरंधरांनी फलंदाजीत केला कहर, गोलंदाजांवर गाजवले वर्चस्व
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती…!