भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत जबरदस्त खेळी करण्यासाठी तयार दिसत आहे. सूर्यकुमार श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत उपकर्णधाराच्या रूपात खेळणार असून त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा देखील आहेत. मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (3 जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियवर खेळला जाणार आहे. सूर्यकुमारने हा सामना सुरू होण्याआधी नेट्समध्ये घाम गाळला. बीसीसीआयने सूर्यचा सराव सत्रातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागच्या एक वर्षापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 2022 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने मागच्या एका वर्षाच्या काळात एकूण 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या आहेत. चाहत्यांना त्याच्याकडून यावर्षी देखील अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातून सूर्या त्याच्या 2023 अभियानाची सुरुवात करेल. तत्पूर्वी बीसीसीआयने त्याचा शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत सूर्यकुमारची फलंदाजी पाहून चाहत्यांच्या त्याच्यकडून असणाऱ्या अपेक्षाही वाढल्याचे दिसत आहे.
A new year 🗓️
A new start 👍🏻
A new Vice-captain – @surya_14kumar – for the Sri Lanka T20I series 😎#TeamIndia had their first practice session here at Wankhede Stadium ahead of the T20I series opener in Mumbai 🏟️#INDvSL | @mastercardindia pic.twitter.com/qqUifdoDsp— BCCI (@BCCI) January 2, 2023
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा () खेळणार नाही. रोहितला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनेड सामन्यात हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप ठीक झाली नसल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या () भारताचे नेतृत्व करणार आहे. मालिकेत रोहितव्यतिरिक्त विराट कोहली आणि केएल राहुल देखील उपस्थित नसतील. अशात युवा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल. सूर्यकुमार पहिल्यांदाच संघाच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे.
संघात रोहित, राहुल नसल्यामुळे सलामीसाठी ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल हे पर्याय उपलब्ध आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. सूर्याने यापूर्वी 9 वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असून यात 43.7 च्या सरासरीने 306 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक 175 चा होता. (Ahead of the T20 match against Sri Lanka, Suryakumar batted brilliantly in the nets.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जावई बरा होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ’, उर्वशीच्या आईने पंतसाठी पोस्ट शेअर करताच युजर्सच्या कमेंट्स
‘तू लढवय्या आहेस’, राहुल द्रविडची पंतसाठी प्रार्थना; कर्णधार पंड्यानेही केले मोठे भाष्य