---Advertisement---

देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेची संपूर्ण माहिती, जाणून घ्या एका क्लिकवर

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 8:49 PM
---Advertisement---

अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील नाॅकआउट सामने खेळले जाणार आहेत. हे सामने 20 ते 31 जानेवारीदरम्यान खेळले जातील. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडून सर्व राज्याच्या संघाना पाठवल्या गेलेल्या पत्रकानुसार सर्व संघ सहा गटात विभागले आहे.

यामध्ये पाच एलिट आणि एक प्लेट गट असणार आहे. या स्पर्धेतील सामने मुंबई, बेंगळुरू, इंदोर, चेन्नई, कोलकाता आणि बडोदा येथे खेळले जातील.

या पत्रकात म्हणले आहे, “बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेने 10 जानेवारी पासून सुरू होईल.” सचिव जय शहा म्हणाले, “संघाना आपापल्या शहरात 2 जानेवारीला एकत्र यावे लागेल. यासोबतच कोरोना विषाणूच्या चाचण्याही केल्या जातील. तसेच त्या-त्या राज्यातील नियमाचे पालन ही केले जाईल.”

प्लेट गटातील सामने चेन्नईत खेळले जातील, ज्यामध्ये आठ संघाचा सहभाग असणार आहे. उर्वरित 30 संघाना पाच एलिट गटात विभागले आहे. ज्यामध्ये प्रत्येक गटात सहा संघ असणार आहेत. नाॅकआउट सामने हे 26 जानेवारीपासून खेळले जातील. त्याचबरोबर क्वार्टर फायनल सामने 26 आणि 27 जानेवारीला खेळले जातील. उपांत्य सामना  29 जानेवारीला आणि अंतिम सामना 31 जानेवारीला अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.

खेळाडूंची कोरोना चाचणी 2, 4, आणि 6 जानेवारीला घेतली जाणार आहे. याचे निकाल लगेच पुढच्या दिवशी जाहीर केले जातील. नाॅकआऊटच्या आधीही 20 आणि 22 जानेवारीला कोरोना चाचणी घेतली जाईल. कोरोना महामारीमुळे उशीरा सुरू होणारी देशांतर्गत हंगामातील ही पहिली स्पर्धा असणार आहे.

गट-

एलिट गट अ- जम्मू काश्मीर, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, रेल्वे, त्रिपुरा, (बेंगळुरूमध्ये)

एलिट गट ब- ओडिसा, बंगाल, झारखंड, तमिळनाडू, आसाम, हैदराबाद (कोलकातामध्ये)

एलिट गट क- गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, बडोदा, उत्तराखंड, (बडोदामध्ये)

एलिट गट ड- सेना, सौराष्ट्र, विदर्भ, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा, (इंदौरमध्ये)

एलिट गट इ- हरियाणा, दिल्ली, आंध्र प्रदेश, मुंबई, केरळ, पुदुच्चेरी, (मुंबईमध्ये)

प्लेट गट- चंदीगड, मेघालय, बिहार, नागालॅंड, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, (चेन्नईमध्ये)

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोणत्याही परिस्थितीत मला तिथे उपस्थित रहायचे आहे’, पालकत्व रजेवर बोलताना विराटचे वक्तव्य

दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी

ऑस्ट्रेलियात मैदान गाजवणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या घालवतोय पत्नीसोबत वेळ; फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---