सामना नुकताच सुरू झाला होता. पहिले षटक टाकले जात होते. फलंदाज खेळपट्टीचा अंदाज घेत होता. गोलंदाज आपली लाइन-लेंथ पकडण्यात व्यस्त होता. कर्णधार आपल्या खेळाडूंमध्ये जोश भरत होता. अन इतक्यात, एक मोठा आवाज मैदानावर येऊ लागला. प्रत्येकाचे डोळे अचानक वरच्या दिशेकडे वळतात. आकाशातून एक हवाई-रुग्णवाहिका जमिनीच्या दिशेने येत होती. कोणत्याही परिस्थितीत जमिनीवर उतरणे हाच तिचा उद्देश दिसत होता. क्रिकेट मैदानावर घडलेली ही एक अनोखी आणि आश्चर्यकारक घटना होती.
इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिप दरम्यान ब्रिस्टल मैदानावर मंगळवारी एक सामना झाला. ग्लॉस्टरशायर आणि डरहम यांच्यात चार दिवसीय सामना खेळला जात होता. सामना सुरू झाला. पहिले षटक चालू असतानाच सामनाधिकाऱ्यांकडे एक बातमी आली. ही माहिती आश्चर्यचकित करणारी होती. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरणार असल्याने सामना काही काळ थांबवावा लागेल, अशी माहिती मिळाली होती. जसे हेलिकॉप्टर खाली आले. तसे सर्व खेळाडू शांतपणे मैदान सोडून बाहेर पडले.
ही एक एअर ऍम्ब्युलन्स होती, जी आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करत असते. जेव्हा सामना थांबवण्यात आला, तेव्हा एक रुग्ण जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढत होता. संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करणारे ब्रिस्टल येथील दक्षिण पश्चिम रुग्णवाहिका सेवेने एक निवेदन जारी केले.
Play has been brought to a halt in Gloucestershire's home fixture with Durham at Bristol – a Great Western Air Ambulance has landed on the field of play. #CountyCricket2021pic.twitter.com/eI3ZtXlm1X
— Wisden (@WisdenCricket) September 21, 2021
निवेदनानुसार, ‘आमच्या टीमला बातमी मिळाली होती की, बिशप्टनच्या परिसरात कुणालातरी डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, ज्याला त्वरित उपचारांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या मैदानापेक्षा आसपासच्या परिसरात हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी दुसरी चांगली जागा नव्हती. म्हणून आम्ही मैदानात हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला.’
एअर ऍम्ब्युलन्स सर्व्हिसने संपूर्ण घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “क्रिकेटच्या मैदानावर या सर्वांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू इच्छितो आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे उतरण्यासाठी आणि गरजू रुग्णाला प्रतिसाद देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.’ त्यानंतर काही वेळात पुन्हा सामना सुरू झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरविरुद्ध खेळणार का रोहित आणि हार्दिक? बोल्टने दिली महत्त्वपूर्ण माहिती
पंजाबविरुद्ध रियान परागने १९ वे षटक टाकणाऱ्या मुस्तफिजुर रहमानला दिला होता ‘हा’ कानमंत्र
कार्तिक त्यागीच्या ‘ऐतिहासिक’ षटकामागील ‘ऑस्ट्रेलियन कनेक्शन’