---Advertisement---

‘अ न्यू स्टार’! एजाज पटेलच्या डावातील १० विकेट्सच्या ऐतिहासिक कामगिरीचे अनोखे सेलिब्रेशन, फोटो व्हिडिओ

On: रविवार, डिसेंबर 5, 2021 3:34 PM
---Advertisement---

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी अनिर्णीत राहिला होता. तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारतीय संघ सध्या विजय मिळवण्याच्या मजबूत स्थितीत आहे. परंतु, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने एका डावात १० गडी बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर हॉटेलमध्ये खास अंदाजमध्ये सेलिब्रेशन करण्यात आले होते. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ४ डिसेंबर ही तारिख सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल. कारण न्यूझीलंड संघातील फिरकी गोलंदाज एजाज पटेलने याच दिवशी भारतात येऊन भारतीय संघाविरुद्ध एकाच डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला.

एकाच डावात १० गडी बाद करणे खूप मोठी गोष्ट असते. असा कारनामा करणारा तो क्रिकेट विश्वातील तिसरा, तर परदेशात जाऊन अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यासह त्याचे नाव वानखेडे स्टेडियमवरील विक्रमांच्या यादीत कोरले गेले आहे.

एजाज पटलेने हा कारनामा आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११ व्या सामन्यात केला आहे. हा कारनामा केल्यानंतर त्याने एक स्पेशल केक कापला. ज्यामध्ये त्याने ज्या १० फलंदाजांना बाद केले त्या १० फलंदाजांचे फोटो आहेत. त्या फोटोवर लिहिले देखील आहे की, त्याने त्या फलंदाजांना कशाप्रकारे बाद केले. जसे की, झेलबाद, पायचीत आणि त्रिफळाचित. तसेच केकच्या मध्यभागी एजाज पटेलचा बालपणीचा फोटो देखील आहे.

या स्पेशल केकवर लिहिले आहे की, एजाज पटेलने ४९.५ षटक गोलंदाजी केली. १२ निर्धाव षटके टाकत ११९ धावा खर्च केल्या आणि १० गडी बाद केले. तसेच या केकवर ‘ अ न्यू स्टार’ असे देखील लिहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

क्रिकेट इतिहासात एकदा नव्हे, तर दोनदा ‘त्याने’ एका गोलंदाजाला डावात १० विकेटस घेताना पाहिले, वाचा ‘त्या’ अवलियाची गोष्ट

‘विराट’सेनेकडून निराशा! टी२० विश्वचषकातील कामगिरीवर गांगुलीने सोडले मौन

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, मोठी अपडेट आली समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---