---Advertisement---

IND vs ENG : रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे चेन्नईत दाखल, ‘इतके’ दिवसांसाठी असतील क्वारंटाईन

On: बुधवार, जानेवारी 27, 2021 7:01 PM
---Advertisement---

भारत विरुध्द इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी आता दोन्ही संघाचे खेळाडू चेन्नईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा हे देखील चेन्नईत दाखल झाले आहेत.

या दोघांसह ऑस्ट्रेलियावरील विजयाचा एक शिल्पकार शार्दुल ठाकूर देखील चेन्नईत पोहोचला. मुंबईकर असलेले हे तीनही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर काही काळ आपल्या घरी वास्तव्यास होते. त्यांनतर मंगळवारी ते चेन्नईत दाखल झाले आहेत.

चेन्नईत पोहोचल्यानंतर हे तीनही खेळाडू थेट आपल्या हॉटेलमध्ये रवाना झाले. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू बायो बबलमध्ये राहतील. या तीन खेळाडूंशिवाय कर्णधार विराट कोहली आणि संघातील इतर सदस्यही बुधवारी चेन्नईत पोहोचतील. भारतीय संघाच्या स्थानिक मिडिया अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

इंग्लंडचे बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि मोईन अली हे याआधीच चेन्नईत दाखल झाले आहेत. ते श्रीलंका दौऱ्यातील इंग्लंड संघाचा भाग नसल्याने लवकर चेन्नईत पोहोचले आहेत. कर्णधार जो रूटसह उर्वरित खेळाडू श्रीलंकेतून बुधवारी चेन्नईत येतील. इंग्लंडने श्रीलंकेला नुकेतच २-० असे पराभूत केले आहे.

तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही संघ चेन्नईच्या लीला पॅलेस या हॉटेलमध्ये ६ दिवस बायो बबलमध्ये राहतील. दोन्ही संघांना २ फेब्रुवारीपासून सरावाला सुरुवात करण्याची परवानगी आहे. पहिला कसोटी सामना ५ फेब्रुवारीपासून सुरु होईल.

या मालिकेत येण्यापूर्वी दोन्ही संघ आपापल्या मागील मालिका जिंकून आले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियालाच २-१ अशा फरकाने पराभूत केले. तर त्याचवेळी इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच देशात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असे पराभूत केले. त्यामुळे आगामी मालिका रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या:

भारतासाठी असे आहे आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचे समीकरण; इंग्लंड विरुद्ध या फरकाने जिंकावी लागेल मालिका

आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर राशिदने केले मोठे वक्तव्य, म्हणाला

विराट सापडला कायद्याच्या कचाट्यात, मिळाली कायदेशीर नोटीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---