भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) 5 ऑक्टोबर कन्यारत्न प्राप्त झाले. त्याची पत्नी राधिकाने (Radhika Rahane) एका गोंडस मुलीला जन्म दिला.
पण रहाणे त्याच्या मुलीच्या जन्माच्यावेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील पहिल्या कसोटी (First Test Match) सामन्यात व्यस्त होता. त्यामुळे त्याला त्याच्या पत्नीकडे आणि नवजात मुलीकडे जाता आले नव्हते. पण हा सामना संपल्यानंतर तो त्याच्या नवजात मुलीला भेटण्यास गेला होता.
आता त्याने काही दिवसांपूर्वी नुकतेच त्याच्या मुलीचा एक फोटो शेअर केला असून तिचे नाव आर्या ठेवले असल्याचे सांगितले आहे. रहाणेने इंस्टाग्रामवर त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘आर्या अजिंक्य रहाणे’, असे तिचे नाव लिहीले आहे.
https://www.instagram.com/p/B4hmG70hddG/
2014मध्ये अजिंक्य रहाणेने त्याची लहानपणीची मैत्रीण राधिकाबरोबर लग्न केले होते.
रहाणेने मागील महिन्यात पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करताना 4 डावात 216 धावा केल्या होत्या. रहाणे आता 14 नोव्हेंबरपासून बांगलादेश विरुद्ध सुरु होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.
रोहितआधी १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव मात्र लोकांना माहित नाही
वाचा-????https://t.co/68sW2pAxdd#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019
भारत विरुद्ध बांगलादेश: पहिल्या कसोटीसाठी एवढ्या तिकीटांची झाली विक्री
वाचा-???? https://t.co/M34p38cQhC#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019






