भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चेन्नई कसोटीत भारताला २२७ धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाच्या या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाच्या इतर खेळाडूंच्या खेळण्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. या सामन्यातील दोन्ही डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेला आपल्या खेळाची योग्य अशी चमक दाखवता आली नाही. त्याने फक्त एकच धाव या दोन्ही डावात काढली होती.
यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी पत्रकार परिषदेत रहाणेचे वेगळेच रुप पाहायला मिळाले. पत्रकारांनी मागील पहिल्या कसोटीतील आपल्या खराब कामगिरीवर टीका केल्याने त्याचा पारा चढला आणि त्याने रागाच्या भरात पत्रकरांना आपल्या मागील पंधरा कसोटी सामन्यांतील कामगिरी तपासून पाहायला सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे, भारताच्या या अनुभवी फलंदाजाने मागील १५ कसोटी सामन्यात जवळपास १००० धावा काढल्या आहेत.
रहाणे म्हणाला की, “जवळपास दोन वर्षांनंतर आम्ही घरेलू मैदानावर क्रिकेट खेळत आहोत. जर तुम्ही माझी मागील घरेलू मैदानांवरील सामन्यातील कामगिरी तपासून पाहिली तर त्यावेळी ती चांगली होती. २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका सामन्यात मी एका सामन्यात ५९ आणि ११५ धावांची खेळी केली होती.”
पुढे रहाणे म्हणाला की, “माझ्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या कामगिरीमध्ये मी अधिक योगदान कसे देऊ शकतो? यावर माझे लक्ष आहे. गेल्या १०-१५ कसोटी सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कदाचित तुम्हाला माझी कामगिरी करेल. तसेही माझ्यावर टीका केल्याने मला कसलाही फरक पडणार नाही. कारण बाह्य जगात काय घडत आहे? याकडे मी लक्ष देत नाही.”
विराट कोहलीचा बचाव करताना रहाणे म्हणाला की, “जेव्हा खेळामधील तुमची ऊर्जा कमी होते; तेव्हा असं काही तरी होतं. परंतु यामागचे कारण असा नाही की, त्यात कर्णधाराची काही चूक आहे. देहबोली नकारात्मक होण्याची अधिक कारणे आहेत. मी आधीच सांगितले होते की विराट आमचा कर्णधार आहे आणि पुढे देखील असेल त्यामुळे तुम्ही जो मसाला शोधण्याचा यात प्रयत्न करीत आहात तो तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींची विविध कारणे असू शकतात.”
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अजिंक्य रहाणे याने आतापर्यंत ७० कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण ४४७२ धावा काढल्या आहेत. तर ९० एकदिवसीय आणि २० टी२० सामन्यांचा विचार केला असता, त्याने अनुक्रमे २९६२ आणि ३७५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने एकूण १४९ आयपीएल सामने खेळले असून ३९३३ इतक्या धावा त्याच्या नावावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
…आणि म्हणून कर्णधार विराट कोहलीने जसप्रीत बुमराहला दिली नाही दुसऱ्या कसोटीत संधी
मैदानावर पाऊल ठेवताच नवा विक्रम नावावर! शून्यावर बाद होऊनही विराट विक्रमवीर, वाचा
कोहलीला रडवलं! चेन्नईतील दुसर्या कसोटीत विराट शुन्यावर बाद; नावावर अनेक नकोसे विक्रम