भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी रहाणेला तब्बल 18 महिन्यानंतर भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. संघ अडचणीत असताना रहाणे खेळपट्टीवर आला आणि दबावाच्या परिस्थितीत मोठी खेळी केली. अवघ्या 11 धावांनी त्याचे शतक हुकले. असे असले तरी आता दुसऱ्या डावात तो फलंदाजी करणार का याबाबत त्याने स्वतः खुलासा केला आहे.
रहाणे याने तिसऱ्या दिवशी भरत लवकर बाद झाल्यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकूरसोबत जोडी जमवली. दोघांनी सातव्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले.रहाणेने 129 चेंडूचा सामना करत 89 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने टिपलेल्या शानदार झेलामुळे त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला.
रहाणेने 89 धावांची खेळी केली असली तरी डावाच्या सुरुवातीला त्याला दुखापत झाली होती. 22 व्या षटकात पॅट कमिन्स याचा उसळी घेणारा चेंडू त्याच्या बोटावर आदळलेला. प्रचंड वेदना होत असताना देखील त्याने टॅपिंग करत आपली खेळी पुढे नेली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याला या दुखापतीविषयी विचारण्यात आले.
तुला वेदना होत आहेत का? असे विचारल्यानंतर त्याने खूप जास्त असे उत्तर दिले. तू दुसऱ्या डावात फलंदाजी करणार का? असे विचारल्यानंतर त्याने हो नक्कीच असे म्हटले. त्यामुळे त्याची ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे समजून येते.
भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाकडे 296 धावांची आघाडी असून, चौथ्या दिवशी वेगाने धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे भारतीय संघाला 400 च्या आसपास धावांचा पाठलाग करावा लागू शकतो.
(Ajinkya Rahane Gives Update On His Fingure Injury In WTC Final)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स