टी२० मालिकेत संघाचा ३-० ने धुव्वा उडवल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ कसोटी मालिकेसाठी आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे जोरदार सराव करताना दिसून आला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणे कडे देण्यात आले आहे, तर चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या सामन्याच्या एक दिवसापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अजिंक्य रहाणेकडून कसून सराव करून घेतला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राहुल द्रविड ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसून येत आहे, तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा जोरदार सराव करताना दिसून येत आहेत.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून ही राहुल द्रविड यांची पहिलीच कसोटी मालिका आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष खेळाडूंच्या कामगिरीवर टिकून असणार आहे की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ कशी कामगिरी करतो. तसेच फॉर्ममध्ये नसलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर देखील सर्वांचेच लक्ष असणार आहे. कारण, हे दोघेही फलंदाज गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत.
𝗦𝗼𝗺𝗲 𝗿𝗶𝗴𝗵𝘁-𝗮𝗿𝗺 𝗼𝗳𝗳-𝘀𝗽𝗶𝗻 𝗮𝗻𝘆𝗼𝗻𝗲? 🤔
🎥 That moment when #TeamIndia Head Coach Rahul Dravid rolled his arm over in the nets. 👍 👍#INDvNZ @Paytm pic.twitter.com/97YzcKJBq3
— BCCI (@BCCI) November 24, 2021
विराट कोहली, रिषभ पंत, रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची फलंदाजी थोडी कमजोर दिसून येत आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तर अतिरिक्त फलंदाजाची आवश्यकता भासल्यास सूर्यकुमार यादव किंवा केएस भरतपैकी एका फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्ली कॅपिटल्सने केले श्रेयसला करारमुक्त; रिषभसह हे चौघे संघात कायम
“आमच्यावेळी गोमांस आणि पोर्क कधीही आहारात नव्हते”; माजी भारतीय क्रिकेटपटूचा खुलासा
रोहित-विराटच्या अनुपस्थितीत काय असावा भारताचा फलंदाजी क्रम? दिग्गजाने दिले उत्तर