भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या तीन दिवसानंतर ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर दिसून येतो. भारतीय संघासाठी या सामन्यात सर्वाधिक सकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे, अजिंक्य रहाणे याने आपला फॉर्म दाखवला आहे. दीड वर्षानंतर पुनरागमन करत असलेल्या रहाणेने दुखापत झाली असतानाही, संघासाठी 89 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर त्याची पत्नी राधिका धोपावकर हिने एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे.
रहाणेने 89 धावांची खेळी केली असली तरी डावाच्या सुरुवातीला त्याला दुखापत झाली होती. 22 व्या षटकात पॅट कमिन्स याचा उसळी घेणारा चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या बोटावर आदळलेला. प्रचंड वेदना होत असताना देखील त्याने टॅपिंग करत आपली खेळी पुढे नेली. दुसऱ्या दिवशी त्याने नाबाद राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याच्या लढवय्या वृत्तीचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्याची पत्नी राधिका हीने देखील एक इंस्टाग्राम पोस्ट करत लिहिले,
https://www.instagram.com/p/CtTVt0XgHHI/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
‘बोटाला सूज आलेली असतानाही तू स्कॅन करण्यास नकार दिला. कारण तुला फलंदाजीवरून आपले लक्ष इतरत्र वळवायचे नव्हते. तू हे करून तुझा निस्वार्थीपणा व ध्येय दाखवून दिले. दृढ निश्चयाने तू तिथे उभा राहिला. सर्वांना प्रेरणा दिली सर्वांना प्रेरणा दिली. तुझ्या याच वृत्तीचा मला नेहमी अभिमान वाटतो. तुला असिमीत प्रेम.’
राधिका व अजिंक्य हे लहानपणापासून मित्र होते. या जोडप्याने 2013 मध्ये विवाह केला. अजिंक्य व राधिका यांना दोन मुली आहेत.
(Ajinkya Rahane Wife Radhika Dhopavkar Instagram Post After His Fighting Knock)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स