इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवार (१२ ऑगस्ट) पासून सुरू झाला आहे. भारतीय संघाने दिवसाच्या सुरुवातीपासून मजबूत खेळी केली. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या पहिल्या विकेटसाठी शतकीय भागीदारीच्या जोरावर भारताला चांगली सुरुवात मिळाली. सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीने लॉर्ड्सच्या मैदानावर कठीण परिस्थितीत देखील ४२ धावा केल्या. ज्यात राहुल सोबत कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली.
असे असले तरी २०१९ पासून कोहलीकडून शतकी खेळी झालेली नाही. त्यामुळे याबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित आगरकरनेही कोहलीबद्दल आपले मत मांडले आहे.
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसानंतर सोनी स्पोर्ट्स सोबत कोहलीबाबत बोलताना अजित आगरकर म्हणाला, “एक महान खेळाडूची हीच ओळख असते. जेव्हा तो फॉर्ममध्ये नसतो, तेव्हा तो खूप मेहनत घेतो. मला नाही माहित सध्या त्याचा खराब फॉर्म आहे की नाही. कारण, दरम्यानच्या काळात त्याने जास्त कसोटी सामने खेळलेले नाहीत.ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील त्याने केवळ एकच कसोटी सामना खेळला होता.”
“त्यानंतर मायदेशात इंग्लंड विरुद्ध देखील त्याची बॅट चालली नाही. अजूनही तो त्याची लय शोधतोय. मात्र त्याने तेच केले, जे संघाला हवे होते. फॉर्ममध्ये नसतानाही त्याने राहुल सोबत शतकीय भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. मात्र दिवस संपायच्या काही षटकांपूर्वी विराट कोहली आऊट झाला.” असेही तो म्हणाला.
त्याचबरोबर भारताचा माजी खेळाडू अजय जडेजाने देखील यावर वक्तव्य केले, “कोहलीने कसोटीमध्ये त्याच्या शेवटचे शतक बांगलादेश विरुद्ध खेळण्यात आलेल्या, दिवस-रात्र कसोटी सामन्यात केले होते. त्यानंतरचा एकूण १० कसोटी सामन्यात त्याने केवळ ३ वेळाच ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. असे असले तरी तो चांगल्या स्थितीत दिसतो आहे.”
पुढे बोलताना जडेजा म्हणाला, “विराट कोहली हा असा खेळाडू आहे. ज्याने पहिल्या डावात ४२ धावा केल्या, परंतु ते त्याच्यासाठी पुष्कळ नाही. कारण त्याने आपल्या सर्वांमध्ये चांगल्या खेळीची आशा निर्माण केली आहे. त्याचीच आपल्याला सवय झाली आहे. तो एकदम मजबूत खेळाडू आहे.”
भारताच्या पहिल्या डावात ३६४ धावा
भारताचा पहिला १२६.१ षटकात ३६४ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने १२९ धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ८३ धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहली (४२), रविंद्र जडेजा (४०) आणि रिषभ पंत (३७) यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोईन अलीला १ विकेट मिळाली.
महत्वाच्या बातम्या –
–भारताच्या ‘या’ दोन महिला क्रिकेटपटूंची ‘द हंड्रेड’मधून माघार; ‘हे’ दिले कारण
–टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि ट्रेनर बदलणार, बायो-बबलमध्ये झाले नाहीत सहभागी
–हमीद आला अन् गेला!! पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने ‘अशी’ काढली विकेट, पाहा व्हिडिओ