पुणे। एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत केतन धुमाळ, आदित्य अभ्यंकर, अभिषेक चव्हाण, सुजल महादेवन, गिरीश कुकरेजा, सुजित कुमार टीपी, गगनदीप वासू, अजितकुमार ब्लावेलील या खेळाडूंनी आपापल्या गटातील मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 35वर्षांवरील पुरुष गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या केतन धुमाळ याने चौथ्या मानांकित मिलिंद मारणेचा 6-0, 6-1असा तर, आदित्य अभ्यंकरने सहाव्या मानांकित सनी सिंगचा 6-0, 6-1असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अभिषेक चव्हाण याने आठव्या मानांकित देवाशिष नांदीचे आव्हान 6-1, 6-1 असे सहज मोडीत काढले. सुजल महादेवन याने सातव्या मानांकित प्रियांक जोशीला 6-0, 6-2 असे पराभूत केले.
45वर्षांवरील पुरुष गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतीत बिगरमानांकीत गिरीश कुकरेजा याने तिसऱ्या मानांकित दिपक पाटीलचा 6-3, 4-6, 10-6 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. सुजित कुमार टीपी याने आठव्या मानांकित राजेश दुसानेवर 6-1, 6-4 असा विजय मिळवला. अकराव्या मानांकित गगनदीप वासू याने पाचव्या मानांकित चन्नाबसवकुमार बाडिगांवरचा 6-2, 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 65वर्षांवरील पुरुष गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत अजितकुमार ब्लावेलील याने दुसऱ्या मानांकित किशोर चौधरीचा 6-4, 2-6, 10-7 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
35वर्षांवरील पुरुष: उप-उपांत्यपूर्व फेरी:
अभिषेक चव्हाण(भारत)वि.वि.देवाशिष नांदी(भारत)[8]6-1, 6-1;
केतन धुमाळ(भारत)वि.वि.मिलिंद मारणे(भारत)[4]6-0, 6-1;
अर्जुन उप्पल(भारत)[3]वि.वि.रामकुमार तिरुवत्तर(भारत)6-1, 6-1;
रवींद्रनाथ पांडे(भारत)[1]वि.वि.श्रीकांत चव्हाण(भारत) 6-2, 6-0;
आदित्य अभ्यंकर(भारत)वि.वि.सनी सिंग(भारत)[6] 6-0, 6-1;
सुजल महादेवन(भारत)वि.वि.प्रियांक जोशी(भारत)[7] 6-0, 6-2;
45वर्षांवरील पुरुष: उप-उपांत्यपूर्व फेरी:
सुजित कुमार टीपी(भारत)वि.वि.राजेश दुसाने(भारत)[8]6-1, 6-4;
राजीव अरोरा(भारत)[4]वि.वि.निर्मल वाधवानी(भारत)[14]6-1, 6-3;
गगनदीप वासू(भारत)[11]वि.वि.चन्नाबसवकुमार बाडिगांवर(भारत)[5]6-2, 6-2;
पराग शहा(भारत)[7]वि.वि.किरण बेमरकर(भारत)6-0, 6-0;
जयकिशन लखानी(भारत)[9]वि.वि.संतोष शहा(भारत)7-6(5), 6-4;
गिरीश कुकरेजा(भारत)वि.वि.दिपक पाटील(भारत)[3]6-3, 4-6, 10-6;
60वर्षांवरील पुरुष: उपांत्यपूर्व फेरी:
दीपांकर चक्रवर्ती(भारत)[1]वि.वि.गुल दर्यानानी(भारत)6-0, 6-2;
अनिल निगम(भारत)[2]वि.वि.भूपिंदर सिंग ओबेरॉय 6-2, 6-1;
श्रीकृष्ण कुलकर्णी(भारत)वि.वि.प्रमोद उमरजे(भारत)6-0, 6-0;
शिरीष नांदुर्डीकर(भारत)वि.वि.विजय देसाई(भारत)6-2, 6-1;
65वर्षांवरील पुरुष: उप-उपांत्यपूर्व फेरी:
योगेश शहा(भारत)[1]पुढे चाल वि.सुरेंद्र सिंग वाधवान(भारत)
अजितकुमार ब्लावेलील(भारत)वि.वि.किशोर चौधरी(भारत) [2] 6-4, 2-6, 10-7;
दिलीपकुमार मेहता(भारत)पुढे चाल वि.ब्रजमोहन मीना(भारत)[7];
टीएस गंभीर(भारत)[8]वि.वि.नरहरी काडेकर(भारत)6-1, 6-1;
राजेंद्र सिंग राठोड(भारत)[3]वि.वि.संजय रासकर(भारत)6-3, 3-6, 10-8;
म्रिदुल बारकाकोटी(भारत)[6]वि.वि.गणेशन राधाकृष्णन(भारत) 6-4, 6-0;
एकनाथ किणीकर(भारत)[5]वि.वि.बाबुलाल पांचाळ(भारत) 6-0, 6-0;
महेंदर कक्कड(भारत)[4]वि.वि.जयंत कुलकर्णी(भारत)6-1, 6-7(5), 10-8.
महत्त्वाच्या बातम्या –
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद: इलाईट गटात पीवायसी १ संघाला विजेतेपद
द्रविडची ‘ती’ गोष्ट पाहून सॅमसन झालेला चकीत, फलंदाजी करतानाच्या आठवणीचाही केला खुलासा
Video: हार्दिक पंड्याची विकेट घेताच धवनचा जोरदार जल्लोष, फ्लाईंग किस देत केले सेलिब्रेशन