सध्या सर्वत्र १९ सप्टेंबरला सुरु होणाऱ्या जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगचीच (आयपीएल) चर्चा सुरु आहे. अशात प्रसिद्ध भारतीय समालोचक आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आपल्या फेसबुक पेजवर बोलताना फिनिशर्सच्या आधारावर आयपीएलचे टॉप-४ संघ निवडले आहेत. Akash Chopra Picked Top-4 Ipl Teams Based On Finishers In Team
आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाला चोप्राने अव्वल क्रमांकावर ठेवले आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “या यादीत मी अव्वल क्रमांकावर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सला ठेवेन. त्यांच्याकडे कायरन पोलार्ड आहे, जो टी२० क्रिकेटमधील दमदार खेळाडू आहे.”
“कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल)मध्ये तो अफलातून कामगिरी करत आहे. त्याने २८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली आहे. तर त्याचे गोलंदाजी प्रदर्शनही उल्लेखनीय दिसत आहे. तो सीपीएलप्रमाणे संयुक्त अरब अमिरातीत खेळल्या जाणाऱ्या आयपीएलमध्येही चांगले प्रदर्शन करेल, यात काही शंका नाही.”
“पोलार्डबरोबर मुंबईकडे क्रुणाल पंड्या आणि हार्दिक पंड्या हे खेळाडू आहेत. त्यामुळे संघात फिनिशर्सचे उत्तम संतुलन पाहायला मिळते. या यादीत सूर्यकुमार यादवलाही जोडता येऊ शकतो, तो त्याच्या फलंदाजी क्रमांकाच्या तुलनेत चांगले प्रदर्शन करतो,” असे बोलताना चोप्राने सांगितले.
तर, या यादीत चोप्राने दूसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सला स्थान दिले आहे. या २ संघातील फिनिशर्सविषयी बोलताना चोप्रा म्हणाला की, “दूसऱ्या क्रमांकावर मला केकेआर संघ सापडला आहे. त्यांच्याकडे आंद्रे रसलसारखा मॅच विनर उपलब्ध आहे. तो एकटाच खूप चांगला आहे. पण, या हंगामात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या इयॉन मॉर्गनचीही संघात भर पडली आहे. तर दिनेश कार्तिकदेखील संघात उपलब्ध आहे. ते तिघेही नक्कीच चांगले खेळतील. रसलला संघ नक्कीच प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवेल. तर मॉर्गनलाही सर्व सामन्यात खेळवले जाईल.”
“या संघातनंतर माझ्याकडे दिल्ली कॅपिटल्स हा संघ आहे. त्यांच्याकडे खूप पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या संघातील रिषभ पंत हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजाला उतरण्याची शक्यता आहे. तर, त्याच्यासोबत डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. सोबतच बोलताना सीपीएलमध्ये कोण चांगले प्रदर्शन करत आहे?,” असा प्रश्नही चोप्राने चाहत्यांना विचारला.
तसेच, दिल्ली कॅपिटल्सविषयी पुढे बोलताना तो म्हणाला की, “दिल्ली संघाला स्पिन गोलंदाजीचा सामना करणाऱ्या फलंदाजांविषयी चिंता करण्याची जास्त गरज नाही. त्यांच्याकडे ऍलेक्स कॅरी आणि मार्कस स्टोइनिस हे २ अन्य पर्याय आहेत. त्यामुळे त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजीची समस्या मिटली आहे.”
याबरोबरच चोप्राने निवडलेल्या यादीत एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला सर्वात शेवटचा अर्थात चौथा क्रमांक दिला आहे. “चौथ्या क्रमांकावर मी चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)ला ठेवेन. कारण त्यांच्याकडे धोनी आहे. तो ‘वन मॅन आर्मी’प्रमाणे आहे. पण त्याच्यासोबत दूसरा कोणी महान फिनिशर नाही. सीएसकेकडे केदार जाधव, रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावो उपलब्ध आहेत, जे सोबत मिळून फिनिशर्सची भूमिका निभावण्यास सक्षम आहेत,” असे शेवटी बोलताना चोप्राने सांगितले आहे.
जेव्हा जेव्हा चेन्नई पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल
आयपीएल २०२०: असे आहे सनरायझर्स हैद्राबादचे वेळापत्रक; जाणून घ्या कधी व केव्हा होणार सामने
अखेर आयपीएल २०२०चे वेळापत्रक जाहीर, मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने होणार स्पर्धेची सुरुवात
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही
आयपीएल २०२० : या ४ दिग्गज खेळाडूंना क्वचितच मिळू शकेल खेळण्याची संधी
आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत