कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा दौरा स्थगित केला आहे. गुरुवारी (३१ डिसेंबर) त्यांनी या गोष्टीची पुष्टी दिली आहे. नविन वर्षात हा दौरा खेळवला जाणार होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
होणार होती तीन सामन्यांची वनडे मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार होती. कॅनबेरा येथे २२ जानेवारी रोजी पहिला वनडे सामना होणार होता. त्यानंतर २५ जानेवारी रोजी मेलबर्न येथे तिसरा आणि २८ जानेवारी रोजी होबार्ट येथे तिसरा व शेवटचा वनडे सामना होणार होता. परंतु आता कोरोना महामारीमुळे हा दौरा पुढील हंगामापर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
ट्विट करत दिली होती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियाद्वारे याविषयी माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की, ‘भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात जानेवारी २०२१ मध्ये होणारी वनडे मालिका कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये ही मालिका खेळवली जाईल. वनडे मालिकेसह या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी२० मालिकाही होईल.”
The three-match Commonwealth Bank ODI series between the Australian and Indian women’s teams originally scheduled for January 2021 will be postponed until next season, with plans to expand the tour to include an additional three Twenty20 Internationals. https://t.co/tU2WiFVcAM
— Cricket Australia (@CricketAus) December 31, 2020
ही तर लैंगिक विषमता- आकाश चोप्रा
यानंतर वर्तमान क्रिकेट समालोचक चोप्रा यांनी ट्विट करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा प्रश्न विचारला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाला तुम्ही कसे समर्थन देऊ शकता? पुरुषांचे क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये चालू आहे; पण त्याच ठिकाणी महिलांचे क्रिकेट नाही खेळवले जाऊ शकणार. लैंगित समानतेवर आता कुणालाही काही म्हणायचे नाही का?”
How does one justify this? Men’s cricket is happening right now but women can’t play. Gender equality, anyone? pic.twitter.com/78e3Fey1Ht
— Aakash Chopra (@cricketaakash) December 31, 2020
https://twitter.com/anilgodara004/status/1344618220976656386?s=20
Absolutely correct sir
The point to be noted by @BCCI @CricketAus & @ICC— Aditya🏏 (@CricCrazyAdi) December 31, 2020
After all big talks of gender equality the world still is a century backward in these matters😈
— Raju Bhai (@RajuBha15786569) December 31, 2020
आकाश चोप्रा यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामागे पैश्यांचे कारण असल्याचे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला कोरोनाचा फटका, २०२२ पर्यंत मालिका स्थगित
आगामी दशकात धावांचा एव्हरेस्ट सर करण्यासाठी ‘हे’ ५ भारतीय खेळाडू सज्ज, शुभमन गिलचाही समावेश
कसोटी क्रमवारीत कोहली, स्मिथवर वरचढ ठरूनही विलियम्सनला नाही गर्व, म्हणाला…