आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेमधील दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघात खेळला जात आहे. तत्पूर्वी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडून कॅच सुटला त्यामुळे अक्षर पटेलची हॅट्रिक होता-होता राहिली. अक्षर पटेल त्याच्या पहिल्या षटकारातच बांगलादेशच्या फलंदाजांवर चांगलाच भारी पडला. त्याने एकापाठोपाठ दोन चेंडूत तंजीद हसन आणि मुश्फिकुर रहिम यांना बाद केले. पण तिसऱ्या चेंडूत म्हणजेच हॅट्रिकवर रोहित शर्माने जाकीर अलीचा कॅच सोडल्यामुळे अक्षरची हॅट्रिक होऊ शकली नाही.
रोहित कडून कॅच सुटल्यामुळे तो नाराज झाला होता. त्याने रागाच्या भरात मैदानावर हात मारले, पण हा कॅच सोडल्यामुळे चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं आहे.
ही गोष्ट बांगलादेशच्या डावात 9व्या षटकारात घडली. जेव्हा अक्षर पटेलने त्याची पहिली षटकार टाकण्यास सुरुवात केली तेव्हा, तंजीत हसन लयीमध्ये खेळत होता. नंतर षटकाराच्या दुसऱ्या चेंडूत अक्षरने त्याला 25 धावांच्या स्कोर वर बाद केले. तो कॅच केएल राहुलने पकडला होता. बांगलादेशच्या फलंदाजीचा सगळ्यात मजबूत स्तंभ मानला जाणाऱ्या मुश्फिकुर रहीमला दुसऱ्या चेंडूवर अक्षरने बाद केले. तसेच तिसऱ्या वेळी जेव्हा जाकीर ली फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा चेंडू त्याच्या बॅटला धडकून रोहित शर्माच्या दिशेने गेला परंतु रोहित शर्मा कडून चेंडू सुटला.
रोहित शर्मा कडून कॅच निसटल्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर खूप संताप व्यक्त केला आहे. एका चाहत्याने म्हटले आहे की, अक्षर आयसीसी स्पर्धेमधील हॅट्रिक घेण्याचा हकदार होता, पण रोहितने त्याला असं करण्यापासून थांबवले. तर एक जण सुपरस्टार म्हणाला आणि ट्रोल केले . व म्हणाला की कॅच सोडण्यासाठी जिगर लागतं चाहत्यांनी त्याला धारेवर धरलेल आहे. एक जण तर असंही म्हणाला की रोहितच्या कॅच सोडण्यामुळे बांगलादेश 100 च्या स्कोर करू शकले.
हेही वाचा
200 वनडे आणि आयपीएल सामन्यांचा ऐतिहासिक टप्पा पार करणारे 5 भारतीय खेळाडू
पाकिस्तानला आयसीसीचा दणका, स्लो ओव्हर रेटसाठी केला दंड
“गूगलचा सिनेमॅटिक टच! जया बच्चन यांच्या डायलॉगसोबत दिला भारतीय संघाला पाठिंबा”






