साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज अॅलिस्टर कूक १२ धावांवर बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने १२ धावांवर केएल राहुलकडे झेल द्यायला भाग पाडले.
या मालिकेत ७ डावात फलंदाजी करताना त्याने १५.५७च्या सरासरीने १०९ धावा केल्या आहेत. ही मालिका कूकसाठी आतापर्यंत तर खूपच खराब ठरली आहे.
तसेच कारकिर्दीत एक नको असलेला विक्रमही या खेळाडूच्या नावावर झाला आहे. गेल्या ८ वर्षांत प्रथमच या क्रिकेटपटूची कसोटीतील सरासरी ४५च्या खाली गेली आहे.
१६० सामन्यात त्याच्या नावावर आता ४४.८९च्या सरासरीने १२२५४ धावा केल्या आहेत. गेल्या ८ वर्षात हीच सरासरी कधीही ४५च्या खाली गेली नव्हती.
२०१०-११मध्ये अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात १८०डाव आधी त्याची सरासरी ४५च्या खाली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
– वॉचमनच्या मुलाची झाली आशिया कपसाठी टीम इंडियात निवड
– आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधारपद
– बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार
– याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय
– वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी