भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षातील त्यांच्या अभियानाची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिका खेळायची आहे. उभय संघांतील टी-20 मालिका 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा टी-20 मालिकेत खेळणार नसल्यामुळे हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल. तसेच संघातील दोन युवा गोलंदाज श्रीलंका संघासाठी सर्वात मोठी बाधा ठरणार आहेत. अनुभवी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यापेक्षाही दे दोन युवा गोलंदाज विरोधी संघासाठी घातक ठरू शकतात.
मागच्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाच्या या दोन युवा गोलंदाजांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. आपण बोलत आहोत अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि उमरान मिलक (Umran Malik) या दोघांविषयी. अर्शदीप सिंग त्याच्या जबरदस्त यॉर्कर आणि आणि शेवटच्या षटकांतील किफायतशीर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तर दुसरीकडे उमरानच्या वेगवान चेंडूपुढे दिग्गज फलंदाजांनी गुडघे टेकण्याची वेळ आली आहे. आता 2023 वर्षाची सुरुवात धमाकेदार पद्धतीने करण्यासाठी दोघेही इच्छुक असतील. भारतीय संघासाठी अर्शदीप आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे. बुमराह आणि शमी दुखापतीच्या कारणास्तव सध्या संघातून बाहेर आहेत.
एक यॉर्कर किंग, तर दुसरा वेगाचा बादशहा
अर्शदीप सिंगने आशिया चषक 2022, तसेच आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघासाठी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. अर्शदीपच्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने अनेकांना प्रभावित केले आहे. शेवटच्या षटकांमध्ये अर्शदीप संघासाठी फायदेशीर ठरला असून सुरुवातीच्या षटकांमध्येही त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्येच त्याने कर्णधार बाबर आझमला बाद केले होते.
अर्शदीप आणि उमरान दोघांनाही इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. उमरानने आयपीएलमध्ये 150 किलोमीचरच्या ताशी गतीने गोलंदाजी केली होती. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर उमरान मलिकला भारतीय संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली. पण भारतासाठी तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही म्हणून त्याला संघातून बाहेरचा रस्ता देखील दाखवला गेला. पण श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याला पुन्हा भारतासाठी खेळण्याची संधी मिळणार आहे. अशात उमरानच्या प्रदर्शनावर देखील सर्वाचे लक्ष्य असणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक , शिवम मावी, मुकेश कुमार. (All eyes will be on the performances of Umran Malik and Arshdeep Singh in the T20I series against Sri Lanka.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकीचा वर्ल्डकप येतोय! जाणून घ्या भारताचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
बीसीसीआयच्या निर्णयावर आयपीएल फ्रॅंचायजींचे प्रत्युत्तर! म्हणाले, ‘ते असे नाही म्हणू…’