ऑल इंडिया सिविल सर्विसेस कबड्डी स्पर्धा २०१९-२० इनडोअर मैदान गव्हर्नरमेंट कॉलेज, कोटशेरा, चौरा मैदान, शिमला हिमाचल प्रदेश येथे दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झालेल्या यास्पर्धेत आज शेवटच्या दिवशी अंतिम सामने व तिसऱ्या स्थानासाठी सामने होणार आहेत.
पुरूषांमध्ये आरएसबी मुंबई (RSB Mumbai) विरुद्ध सेंट्रल सिविल सेक्रेटरीट, दिल्ली यांच्यात अंतिम फेरीचा सामना होईल. आरएसबी मुंबई संघाने उपांत्यपूर्व फेरीत इंदोरचा एकतर्फी पराभव केला होता. तर उपांत्य फेरीत चेन्नई संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सेंट्रल सिविल सेक्रेटरीट, दिल्ली संघाने हिमाचल प्रदेश सेक्रेटरीट संघावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र महिला संघाने साखळीत सर्व सामने जिंकत बादफेरी गाठली होती. तसेच उपांत्यपूर्व फेरीत केरळचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. परंतु उपांत्यफेरीत आरएसबी जयपूर विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्र महिला संघ आज चेन्नई विरुद्ध तिसऱ्या स्थानासाठी खेळणार आहे. तर महाराष्ट्र शासन पुरुष संघाचे उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आले.
ऑल इंडिया सिविल सर्विसेस कबड्डी (महिला सामने) –
अंतिम सामना:
हिमाचल प्रदेश सेक्रेटरीट विरुद्ध आरएसबी जयपूर
तिसरे स्थान:
महाराष्ट्र विरुद्ध हरियाना
ऑल इंडिया सिविल सर्विसेस कबड्डी (पुरुष सामने) –
अंतिम सामना:
आरएसबी मुंबई विरुद्ध सेंट्रल सिविल सेक्रेटरीट दिल्ली
तिसरे स्थान:
हिमाचल प्रदेश सेक्रेटरीट विरुद्ध आरएसबी चेन्नई