आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ सातत्याने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यातच आता संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित १३ व्या हंगामातून बाहेर पडला आहे. याबद्दल चेन्नईचे सीइओ कासी विश्वनाथन यांनी माहिती दिली आहे.
एएनआयशी बोलताना विश्वनाथन यांनी सांगितले की ‘ब्रावो मांडीच्या दुखापतीमुळे यापुढे खेळणार नाही. तो पुढील १-२ दिवसात घरी परत जाईल.’
याबरोबरच विश्वनाथन यांनी हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्या अनुपस्थितीबद्दलही मत मांडले. ते म्हणाले, ‘नक्कीच रैना आणि हरभजन सीएसके संघाचील महत्त्वाचे भाग आहेत आणि त्यांची कमी जाणवत आहे. पण तूम्हाला त्यांच्या वैयक्तिक निर्णयांचा आदर राखला पाहिजे.’
चेन्नई संघ हंगामाच्या सुरुवातीपासूनच करतोय संकटांचा सामना
नेहमी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजला जाणारा चेन्नई संघ यंदाच्या आयपीएल हंगामात मात्र संघर्ष करताना दिसत आहे. त्यांनी आत्तापर्यंत १० पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. तसेच त्यांचे प्लेऑफमध्ये पोहचणेही आता कठीण झाले आहे.
तसेच त्यांना या हंगामाच्या सुरुवातीपासूनच संकटांचा सामना यंदा करावा लागला आहे. सुरुवातीलाच सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणांनी आयपीएलमधून माघार घेतली. तसेच चेन्नईचे काही सदस्य कोविड पॉझिटिव्ह आढळले. तर हंगाम सुरु झाल्यानंतर सुरुवातीलाच काही खेळाडू दुखापतग्रस्त होते. त्यानंतर आता ब्रावो देखील आयपीएल२०२०मधून बाहेर पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सलग तिसऱ्या वर्षी वयस्कर खेळाडूंसह खेळणे कठीण’
निकोलस पुरनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे मास्टर ब्लास्टरला आठवला ‘हा’ दिग्गज खेळाडू
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली