टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) पर्थ येथे पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली. काय होता तो नकोसा विक्रम चला जाणून घेऊया…
अफगाणिस्तानचा नकोसा विक्रम
या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तसेच, अफगाणिस्तान संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. यावेळी फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाच्या फलंदाजांचा इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. त्यांचा डाव 19.4 षटकांमध्येच 112 धावांवर संपुष्टात आला. यामुळे त्यांच्या नावावर नकोसा विक्रम झाला. टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्व दहाच्या दहा खेळाडू झेलबाद होणारा अफगाणिस्तान दुसराच संघ ठरला.
Sam Curran takes five as England bowl Afghanistan out for 112 ????????#T20WorldCup | #ENGvAFG | ???? https://t.co/9aZs8aFGQ6 pic.twitter.com/VAV5uIcMTm
— ICC (@ICC) October 22, 2022
जर्मनीच्याही नावावर नकोसा विक्रम
अफगाणिस्तानपूर्वी हा नकोसा विक्रम जर्मनी संघानेही केला होता. 2022मध्ये जून महिन्यात खेळवण्यात आलेल्या जर्मनीतील टी20 तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात जर्मनीने झेलबाद होण्याचा नकोसा कारनामा केला होता. ऑस्ट्रिया संघाने दिलेल्या 141 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जर्मनीच्या संघाचा डाव 18.4 षटकात 103 धावांवर संपुष्टात आला होता. या सामन्यात सर्व दहाच्या दहा खेळाडू झेलबाद झाले होते. या तिरंगी मालिकेतील तिसरा संघ स्वीडन होता. मात्र, या तिरंगी मालिकेचा विजेता जर्मनी संघच ठरला होता.
अफगाणिस्तानचा डाव
अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना इब्राहिम जद्रान (32) आणि उस्मान घनी (30) यांनाच सर्वाधिक धावा करण्यात यश आले. इतर खेळाडूंना साध्या 15 धावाही करता आल्या नाहीत. कर्णधार मोहम्मद नबी याला फक्त 3 धावा करता आल्या. अफगाणिस्तानचे 3 फलंदाज शून्य धावेवर तंबूत परतले. यामध्ये राशिद खान (Rashid Khan) याचाही समावेश होता. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानचे सर्व फलंदाज हे झेलबाद झाले.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्व खेळाडू झेलबाद होणारे संघ
जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया, क्रेफेल्ड (2022)
अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, पर्थ (2022)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमी की शाहीन आफ्रिदी? माजी विश्वविजेता कर्णधार म्हणाला, ‘पाकिस्तानचा गोलंदाज खूपच…..’
लेट पण थेट! 2007 ते 2022, न्यूझीलंडने चार वेळा केला ऑस्ट्रेलियाचा दौरा, पण शेवटी ऑस्ट्रेलियाला लोळवलंच






