---Advertisement---

ऑस्ट्रेलियाची कर्णधार Alyssa Healy बनली फोटोग्राफर, पण घडली मोठी चूक; पत्रकार परिषदेत केला खुलासा

On: सोमवार, डिसेंबर 25, 2023 11:30 AM
Alyssa-Healy
---Advertisement---

Alyssa Healy Turns Photographer: भारतीय संघाने रविवारी (दि. 24 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया महिला संघाला पहिल्यांदाच कसोटीत पराभूत करत इतिहास घडवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी 8 विकेट्सने दणदणीत विजय साकारला. 10 वर्षानंतर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, पराभूत होऊनही ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली फोटोग्राफर बनल्याचे पाहायला मिळाले.

एलिसा हिली बनली फोटोग्राफर
एलिसा हिली (Alyssa Healy) हिने भारतीय महिला संघ (India Women Team) ट्रॉफीसोबत जल्लोष करत असताना त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तिचा यादरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. मात्र, यादरम्यान हिलीने एक चूक केली, ज्याविषयी तिने सामन्यानंतर स्वत: सांगितले.

हिलीचा खुलासा
ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार एलिसा हिली हिने सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, “फोटो घेताना मी भारतीय संघाच्या अर्ध्या खेळाडूंना फोटोत घेतलेच नाही. त्यामुळे थोडेच खेळाडू फोटोत येऊ शकले.” मात्र, ती असेही म्हणाली की, “मी हे जाणूनबुझून केले नाही. हे माझ्याकडून चुकून घडले.”

https://twitter.com/BCCIWomen/status/1738861339978952968?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1738861339978952968%7Ctwgr%5E0788047e37c8cc99488a747fc91a3721d503570c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fcricket-hindi%2Falyssa-healy-turns-photographer-for-indian-womens-team-6609214%2F

सामन्याचा आढावा
सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये शानदार प्रदर्शन केले. भारतीय गोलंदाजांनी सकाळी 28 धावा खर्च करत ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात 261 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 75 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने 19व्या षटकात 2 विकेट्स गमावत आव्हान पार केले. यावेळी सलामी फलंदाज स्मृती मंधाना हिने नाबाद 38 धावांची खेळी केली. तसेच, जेमिमा रॉड्रिग्ज हीदेखील 12 धावांवर नाबाद होती.

भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या होत्या. त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रलियाने पहिल्या डावात 219 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यात सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्यामुळे स्नेह राणा हिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. (alyssa healy turns photographer for indian womens team tells reason know here)

हेही वाचा-
नवे सत्य जगासमोर! फक्त हार्दिकला ट्रेड करता यावे म्हणून मुंबईने मोजले तब्बल 100 कोटी
विराटकडे फक्त 4 दिवस, सहज होऊ शकतो इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---