---Advertisement---

‘या’ विषयावर रिकी पाँटिंग आणि पृथ्वी शॉमध्ये होते सर्वात जास्त चर्चा

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 10:04 PM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्यासाठी आयपीएल २०२० अत्यंत निराशाजनक राहिली होती. हंगामाची सुरुवात चांगली केल्यानंतर स्पर्धा पुढे जात असताना त्याच्या फॉर्ममध्ये कमालीची घसरण झाली. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळण्यात देखील आले.

आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऍडलेड येथील पहिल्या कसोटीत त्याला खेळण्याची संधी मिळाली. मात्र, त्या कसोटीच्या दोन्ही डावात तो अनुक्रमे ० व ४ धावा करू शकला. त्यानंतर, संपूर्ण दौऱ्यात त्याला संधी मिळाली नाही. भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही त्याला निवडण्यात आले नव्हते.

आयपीएल २०२१ मध्ये दमदार सुरुवात
मागील आयपीएलमधील कामगिरी विसरून शॉने २०२१ आयपीएलची दमदार सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने केवळ ३८ चेंडूत ७२ धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीमुळे दिल्लीला हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळाला.

पाँटिंगचे केले कौतुक
चेन्नई विरुद्ध मॅचविनिंग खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉने दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगचे कौतुक केले. शॉ म्हणाला,
“पाँटिंगची आणि माझी क्रिकेटविषयी जास्तीत जास्त चर्चा होते. नवीन कल्पना व रणनीती तो मला सांगत असतो. त्याने भरपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. तो आपला अनुभव सर्वांशी वाटत असतो. त्याचे युवा खेळाडूंवर विशेष लक्ष असते. त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आनंद वाटत आहे.”

आपल्या फॉर्मविषयी बोलताना तो म्हणाला, “आयपीएल सुरू होण्यापूर्वी मी भरपूर मेहनत घेतली. तंत्राच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिले. विजय हजारे ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी दोन आठवडे मी स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच रजनीकांत व प्रवीण आमरे सर यांच्यासोबत सराव केला. त्यांनी मला नैसर्गिक खेळ करण्यावर भर देण्यास सांगितले.”

विजय हजारे ट्रॉफीमध्ये केली देखणी कामगिरी
पृथ्वी शॉने आयपीएलपूर्वी संपन्न झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये ८०० पेक्षा जास्त धावा काढून विक्रमी कामगिरी केली. त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबईने यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीवर कब्जा केला.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाचे ‘हे’ २८ खेळाडू होणार करोडपती, बीसीसीआयच्या वार्षिक मानधन कराराची घोषणा

आरसीबीत सामील होताच चमकलं ‘मॅक्स’भाऊचं नशीब; मागील ३ वर्षात न जमलेला पराक्रम अवघ्या २ सामन्यात केला

SRHच्या विकेट्स पडत होत्या अन् क्षणाक्षणाला कॅमेरा तिच्याकडे वळत होता, पाहा चर्चित ‘मिस्ट्री गर्ल’चे फोटो!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---