---Advertisement---

अजब! अंबाती रायुडूची रिटायरमेंटची घोषणा, अर्ध्या तासात केले ट्वीट डिलीट

On: शनिवार, मे 14, 2022 2:10 PM
Ambati-Rayudu
---Advertisement---

आयपीएल २०२२चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. अशात चेन्नई सुपर किंग्स संघाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. धडाकेबाज फलंदाज अंबाती रायुडूने ट्वीट करत ही त्याची शेवटची आयपीएल असल्याचे सांगितले. मात्र, काही वेळानंतर त्याने आपली पोस्ट डिलीट केली. तरीही सोशल मीडियावर त्याच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत.

अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. आयपीएल खेळताना आणि १३ वर्षांपासून २ महान संघांचा भाग असताना मला खूप आनंद झाला. या अद्भुत प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे मनापासून आभार मानायला आवडेल.”

Ambati-Rayudu
Photo Courtesy: Twitter/RayuduAmbatA

रायुडूची यंदाच्या हंगामातील कामगिरी
या हंगामात रायुडूने १२ सामन्यात फलंदाजी करताना २७.१०च्या सरासरीने २७१ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १ अर्धशतकही झळकावले आहे.

चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू
रायुडूने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. रायुडू २०१८पासून चेन्नई संघाच्या फलंदाजी फळीतील महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याने संघाला अनेक कठीण प्रसंगातून विजय मिळवून दिला आहे. रायुडूने आतापर्यंत चेन्नई संघाकडून ७३ आयपीएल सामने खेळले आहेत. यातील ६७ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३२.७९च्या सरासरीने १७७१ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि ८ अर्धशतकेही चोपली आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईचे ७ वर्षे केले प्रतिनिधित्व
यापूर्वी रायुडू २०१० ते २०१७ या दरम्यान मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने यादरम्यान ११४ सामने खेळले. यातील १०७ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने २७.१४च्या सरासरीने २४१६ धावा चोपल्या. यामध्ये १४ अर्धशतकांचा समावेश आहे.

एकूण आयपीएल कारकीर्द
अंबाती रायुडूने आयपीएलमध्ये एकूण १८७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.२८च्या सरासरीने ४१८७ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि २२ अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद १०० ही आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘विसरून जा तुझं लग्न झालेलं अन् तुला मुलगी होती’, खराब फॉर्मातील विराटला इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ला

‘मी आणखी करू तरी काय?’, अवघ्या २० धावांवर तंबूत परतताना विराटची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद; चाहतेही दु:खी

आयपीएलमधील ६० सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठा बदल; पंजाबला प्लेऑफमध्ये एंट्री करण्यासाठी कसे आहे समीकरण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---