भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत फलंदाजी करतानाचा क्षण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले आहे. २०११ला लंडनमध्ये ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात मिश्राने सचिनसोबत फलंदाजीचा आनंद लुटला होता.
जरी भारतीय संघाने तो कसोटी सामना गमावला होता, तरी मिश्राने सचिनसोबत खूप वेळ फलंदाजीचा आनंद घेतला होता.
दिल्ली कॅपिटल्सच्या इंस्टाग्राम सेशनवर बोलताना मिश्राने सचिनसोबतच्या क्षणाचा उल्लेख केला. तो म्हणाला की, “पाजीसोबत (सचिन) फलंदाजी करायला मिळाली म्हणून मला गर्व वाटतो. मला वाटते की हा क्षण माझ्या कसोटी कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे.” Amit Mishra said, batting with sachin tendulkar was the memorable moment of Test career.
“२०११ला आम्ही इंग्लंड दौऱ्यावर खेळत होतो. त्यावेळी शेवटच्या सामन्यातील पहिल्या डावात मी ४३ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात आम्हाला इंग्लंडने फॉलोऑन दिला होता आणि पराभूत होऊ नये म्हणून सर्वांनी चांगले खेळण्याची गरज होती. त्यावेळी मी नाईट वॉचमनप्रमाणे मैदानावर उतरलो होतो आणि पाजी मला डावादरम्यान मार्गदर्शन करत होते.”
यावेळी मिश्राने सचिनसोबत भागीदारी करत १० चौकारांसह ८४ धावा केल्या होत्या. तर सचिनने ११ चौकारांसह ९१ धावा केल्या होत्या. तरी इंग्लंडने हा सामना एका डाव व ८ धावांनी जिंकला होता.
शिवाय, दिल्ली कॅपिटल्सविषयी बोलताना मिश्रा म्हणाला की, “दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ८ वर्षे खेळल्यामुळे माझे संघाशी भावनिक नाते जोडले गेले आहे. हा संघ माझ्या डीएनएचा भाग असल्याप्रमाणे मला वाटते. प्रत्येक वेळेला मैदानावर उतरल्यानंतर १०० टक्केपेक्षा उत्कृष्ट देण्याचा मी प्रयत्न करतो. माझा संघ, संघाचे मालक आणि व्यवस्थापक यांचे नेहमी मला सहकार्य लाभले आहे.”
मिश्राने गरजू व्यक्तिंसाठी दानही दिले आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “माझे काही मित्र एनजीओ आणि पोलिसमध्ये आहेत. त्यांनी मला कोरोना व्हायरसमुळे त्रस्त असलेल्या काही लोकांच्या समस्यांविषयी सांगितले होते. म्हणून मी त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना दररोज लागणाऱ्या गोष्टी जसे की, रेशन, मास्क, किट इत्यादी दिले.”
ट्रेंडिंग घडामोडी-
एकेवेळी भारताचा कॅप्टन कूल असलेल्या धोनीच्या घरी मात्र ‘ही व्यक्ती’ धोनीचंच ऐकत नाही
जास्तीत जास्त ४ चेंडू, त्यापेक्षा जास्त स्मिथ माझ्यापुढे टिकणं कठीण
स्मिथ की विराट? असा प्रश्न जेव्हा विराटचा खास मित्र एबीला विचारला…