नुकतचं काल (15 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाला नवा गोलंदाजी प्रशिक्षकही मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा मोर्ने मॉर्केल टीम इंडियाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. माॅर्केलची निवड करणे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा निर्णय असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच गौतम गंभीरचा जुना व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो परदेशी प्रशिक्षकाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करत आहे.
गौतम गंभीर भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक बनल्यानंतर कोचिंग स्टाफमधील अनेक सदस्य बदलले आहेत. अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेटे आधीच टीम इंडियामध्ये सामील झाले होते. आता मोर्नी मॉर्केलचे नावही फायनल झाले आहे. विशेष म्हणजे अभिषेक नायर, रायन टेन डोशेट आणि मोर्ने मॉर्केल या तिघांनीही आयपीएलमध्ये गौतम गंभीरसोबत काम केले आहे.
बीसीसीआयने बुधवारी मॉर्नी मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची माहिती दिली. मॉर्केलचे नाव निश्चित झाल्यानंतर 2022 मधील गौतम गंभीरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये गंभीर म्हणत आहे की, ‘फक्त भारतीयच भारतीय संघाचा प्रशिक्षक असावा. भावनांचा विषय आहे. परदेशी प्रशिक्षक, ज्यांना इथे खूप महत्त्व दिले जाते, ते फक्त पैसे कमावण्यासाठी इथे येतात. पण एक चांगली गोष्ट जी गेल्या सहा वर्षांत घडू शकली आणि घडली ती म्हणजे आता फक्त भारतीय खेळाडूंनाच प्रशिक्षक बनवले जात आहे. आशा आहे की हा ट्रेंड कायम राहील.
View this post on Instagram
ज्यामध्ये गौतम गंभीर पुढे म्हणतो, ‘माझा विश्वास आहे की भारतीय संघाचा प्रशिक्षक हा फक्त भारतीयच असावा. खेळात भावना असतात. फक्त ती व्यक्ती भारतीय क्रिकेट किंवा खेळासाठी भावनिक असू शकते, जी देशासाठी खेळली आहे. अनिल कुंबळे, रवी शास्त्री आणि आता राहुल द्रविड. अशा भारतीय प्रशिक्षकाच्या हाताखाली मीही खेळलो असतो असे मला वाटते.
टी-20 विश्वचषक संपताच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कोचिंग स्टाफमधील अनेक सदस्यांचा कार्यकाळ संपला होता. यानंतर गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. तर गंभीरचा कार्यकाळ 2027 पर्यंत असणार आहे.
हेही वाचा-
श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत अंपायरर्सकडून मोठी चूक, निकाल बदलला असता? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटणार? बीसीसीआय सचिव जय शहांची मोठी प्रतिक्रिया
काय सांगता.! आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांची चक्क इतक्या रुपयांची कमाई, पाहा सर्वात महागडा कोण?