---Advertisement---

Video: बीसीसीआयचा लोगो दाखवत लाॅर्ड्स मैदानावर अज्ञात चाहत्याचा गोंधळ, खेळाडूंचे विनापैशाचे मनोरंजन

On: शनिवार, ऑगस्ट 14, 2021 11:38 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (१४ ऑगस्ट) एक गमतीशीर घटना घडली. एक चाहता थेट मैदानात आला होता आणि भारतीय संघाचा सदस्य असल्याचे भासवत होता. हे पाहून मैदानावरील खेळाडूंनाही हसू आवरता आले नाही.

क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघ फलंदाजी करत असताना एका व्यक्तीने अचानक सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुपारच्या जेवणानंतर एक प्रेक्षक मैदानात शिरला. असे दृश्य अनेक वेळा पाहिले गेले आहे. पण, इथे जे घडले ते खूप वेगळे होते. ही व्यक्ती सुरक्षा रक्षकांचेही ऐकत नव्हती.

ज्या व्यक्तीने मैदानात प्रवेश केला, त्याने भारतीय संघाच्या जर्सीसारखी जर्सी घातली होती. ज्यावर बीसीसीआयचा लोगो होता.  कारणास्तव, जेव्हा सुरक्षा रक्षकाने या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खेळाडूंपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने त्याच्या टी-शर्टवर बीसीसीआयच्या लोगोकडे बोट दाखवले.

सुरक्षा कर्मचाऱ्याने मैदानाबाहेर काढले
जेव्हा सुरक्षा रक्षक त्याला बाहेर जाण्यास सांगत होते. तेव्हा तो त्यांचे ऐकत नव्हता आणि टाळ्या वाजवून आणि आपले दोन्ही हात वर करून क्षण साजरा करत होता. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीचे ऐकले नाही आणि दोन-तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला जबरदस्तीने बाहेर काढले आणि त्याला बाहेर काढले. या व्यक्तीच्या नावाबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाही किंवा ती कोठून आहे हे माहित नाही. परंतू, त्याने परिधान केलेल्या भारतीय संघाच्या जर्सीवर ‘जर्वो’ असे नाव लिहिलेले होते आणि जर्सीचा क्रमांक ६९ होता.

रूटने शतक पूर्ण केले
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आपली चमकदार फलंदाजी सुरू ठेवत सलग दुसरे शतक झळकावले. यापूर्वी त्याने नॉटिंघममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात १०९ धावा केल्या होत्या आणि रूटने लॉर्ड्स कसोटी सामन्यातही आपला फॉर्म सुरू ठेवला आहे.

त्याने इंग्लंडकडून पहिल्या डावात नाबाद १८० धावांची शतकी खेळी केली. त्याच्याव्यतिरित्क जॉनी बेअरस्टोने ५७ धावांची खेळी केली. तर रॉरी बर्न्सने ४९ धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ३९१ धावा केल्या आणि २७ धावांची आघाडी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

आजपर्यंत इंग्लंडच्या कोणत्याच कर्णधाराने केला नव्हता तो ‘मोठा’ पराक्रम रुटने करुन दाखवलाच

भारताचा विश्वविजेता कर्णधार उन्मुक्त चंद खेळणार अमेरिकेतील ‘या’ स्पर्धेत; संघासह करारही झाला

इरफान पठाणची प्रशिक्षक होण्याची तयारी पूर्ण; राहुल द्रविडचे मार्गदर्शनाबद्दल मानले आभार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---