साउथॅंप्टन | भारतीय संघ आजपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढले आहे.
मालिकेतील आव्हान राखण्यासाठी तसेच आयसीसी क्रमवारीत आपले स्थान भक्कम करण्यासाठी टीम इंडियाला हा विजय खुप महत्त्वाचा आहे.
या मालिकेत ३ सामन्यात १७ विकेट्स घेणाऱ्या जेम्स अॅंडरसनला मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. कसोटीत वेगवान गोलंदाजांत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम करण्यासाठी त्याला केवळ ७ विकेट्सची गरज आहे.
त्याने १४१ कसोटी सामन्यात २६.८५च्या सरासरीने ५५७ विकेट्स घेतल्या आहेत. तर या यादीत अव्वल स्थानी असणाऱ्या ग्लेन मॅकॅग्राने १२४ कसोटीत ५६३ विकेट्स घेतल्या आहेत.
Records are meant to be broken, and he will be proud when James Anderson goes past his, says Glenn McGrath.
➡️ https://t.co/li63QjxcDh pic.twitter.com/IT7BAQb37S
— ICC (@ICC) August 27, 2018
कसोटी क्रमवारीत तब्बल ९०३ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झालेला इयान बाॅथमनंतरचा तो दुसराच इंग्लिश खेळाडू आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
८००- मुथय्या मुरलीधरन (सामने- १३३)
७०८- शेन वॉर्न (सामने- १४५)
६१९- अनिल कुंबळे (सामने- १३२)
५६३- ग्लेन मॅकग्रा (सामने- १२४)
५५७- जेम्स अँडरसन (सामने- १४१)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज
५६३- ग्लेन मॅकग्रा (सामने- १२४)
५५७- जेम्स अँडरसन (सामने- १४१)
५१९- कर्टनी वाॅल्श (सामने- १३२)
४३४- कपील देव (सामने- १३१)
४३१- सर रिचर्ड हॅडली (सामने- ८६)
महत्त्वाच्या बातम्या-
– एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक
– …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!
–भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…
– आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू
–लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे
-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?
-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड
-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक
-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी