भारतासाचा भालाफेकपटू नीरज चोप्राचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंग करणाऱ्या ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सवर प्रणाघातक हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या प्रकरणत पीटर्सला दुखापत झाल्याचेही वृत्त समोर आलं आहे.
विशेष म्हणजे पीटर्स राष्ट्रकूल स्पर्धा संपल्यानंतर आपल्या मायदेशी परतला होता. त्यानंतर लगेचच त्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात स्थानिक पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात देखील घेतल आहे. व्यारल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये पीटर्सला बोटीवर मारहाण झाली असल्याचे स्पष्ट झोले असून, मारहाण केल्यानंतर त्याला बोटीतून बाहेर फेकल्याचीही माहिती मिळाली आहे. अद्याप या घटनेमागील कारण समोर आले नसले तरी या घटनेचा जगभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
https://twitter.com/StGeorgesDBJ/status/1557554449912045568?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1557554449912045568%7Ctwgr%5Efe738322993b71a2a4145a39fb6f87ba38ae9f7a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fneeraj-chopra-rival-javelin-world-champion-anderson-peters-beaten-and-thrown-off-party-boat-video-goes-viral-4467083.html
ज्या बोटीवर ही घटना घडली ती बोट त्रिनिदादच्या व्यापार मंत्र्यांच्या मुलाची आहे. या प्रकरणात, ग्रेनेडाच्या ऑलिम्पिक समितीने एक दिवस आधी अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली होती की, “पीटरसनवर हल्ला करणारे लोक ग्रॅनडाचे नाहीत आणि या घटनेत खेळाडूला गंभीर दुखापत झाली नाही. सध्या आमची नजर पीटर्सच्या दुखापतीतून सावरण्यावर आहे. या प्रकरणाबाबत आम्ही सर्व पीटर्ससोबत आहोत आणि लवकरात लवकर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.”
दरम्यान, पीटर्सने नुकतेच युजीन, यूएसए येथे झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. त्याने ९०.५४ मीटर अंतरावर भाला फेकून आपल्या विजेतेपदाचे रक्षण केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजने भालाफेकमध्ये ८८.१३ मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले होते. मात्र, पीटर्सला राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही आणि भालाफेकमधील सुवर्णपदक पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पटकावले. नदीमने ९०.१८ मीटर अंतर पार करत सुवर्णपदक जिंकले. तर पीटर्सला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला फक्त २०२३चा विश्वचषक खेळायचा आहे’, असे म्हणत भारताच्या सलामीवीराने सांगितला त्याचा फ्युचर प्लान
भारतीयांना नडणाऱ्या मॅकॉयचा न्यूझीलंडविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, टी२०तील अद्भुत विश्वविक्रमाला गवसणी