आयर्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार अँन्ड्रू बलबर्णी याने आयर्लंड संघातील खेळाडूंचं आगामी इंडियन क्रिकेट लीग (IPL) खेळण्याबाबत महत्त्वाचं विधान केलं असून आमच्या संघातील खेळाडू एक ना एक दिवस नक्कीच आयपीएल खेळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी आयर्लंडचा संघ सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौर्यावर असून तेथे आयोजित एका पत्रकार परिषदेत कर्णधार बलबर्णीने ही भूमिका मांडली.
कर्णधार बलबर्णी म्हणाला, “आयपीएल एक जगातील उत्कृष्ट व मोठी स्पर्धा आहे. आयर्लंडचे खेळाडू जर या स्पर्धेत खेळले तर ही आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल.” तथापि त्यासाठी आम्हाला आमच्या कामगिरीत सातत्य ठेवावं लागेल, असेही त्याने नमूद केले.
आयपीएलचा 13 वा हंगाम हा दुबईत निर्विघ्न पार पडला असून आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी 2021 च्या हंगामाची पूर्वतयारी सुरू केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अशा वेळी नवोदित खेळाडूंसाठी आयपीएलचा हा हंगाम पर्वणीच ठरणार आहे.
आयर्लंडचा कर्णधार बलबर्णीने संयुक्त अरब अमिराती (UAE) क्रिकेट संघाचा कर्णधार अहमद रझाचं उदाहरण देताना त्याचं कौतुक केलं आहे. अहमद रझाने मागील वर्षी रॉयल चँलैंजर्स बंगलोर (RCB) संघाच्या प्रशिक्षण केंद्रात सहभाग नोंदवला होता. आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन संघात सध्या यूएईत एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू असून काही कारणास्तव काही सामने पुढे ढकलण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या नवदीप सैनीने सिडनीत कसोटी पदार्पण केले, त्याच्यासाठी एकवेळ भांडला होता गंभीर
… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती
“विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड”