पहिल्या कसोटी सामन्यामध्ये मोहम्मद सिराजची (Mohmmed Siraj) गोलंदाजी कामगिरी काही विशेष ठरली नाही. हेडिंग्ले येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही डाव मिळून त्याला फक्त दोन विकेट्सच मिळाल्या. शिवाय, तो धावांवर नियंत्रण ठेवण्यातही अपयशी ठरला. पहिल्या डावात सिराजने 27 षटके टाकली आणि त्यात तब्बल 122 धावा लुटवल्या. दुसऱ्या डावात त्याने 14 षटके टाकली आणि 51 धावा दिल्या, पण एकही विकेट मिळवता आली नाही.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सिराज फक्त गोलंदाजी नव्हे, तर आपल्या फलंदाजीवरही मेहनत घेताना दिसला. मात्र, नेट सरावादरम्यान सिराज थोडा नाराज दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये तो रागात असल्याचं पाहायला मिळालं. खरं तर, सरावादरम्यान त्याची बॅट तुटली होती, त्यामुळे तो थोडा त्रासलेला वाटत होता. तो बाकी खेळाडूंना विचारताना दिसला की, त्याची बॅट नेमकी कशी तुटली?
भारत इंग्लंड (IND vs ENG 2nd Test Match) मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जुलै पासून खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यातील निराशा जनक कामगिरीनंतर दुसऱ्या सामन्यात चांगली खेळी करण्याचा सिराजचा प्रयत्न असेल.






