भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायुडू याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर चेन्नईने विजेतेपद पटकावत त्याला विजयी निरोप दिला. यानंतर अवघ्या काही तासानंतरच त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातूनही निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर आता भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
रायुडू आपल्या कारकिर्दीमध्ये अनेकदा वादग्रस्त ठरला होता. तसेच त्याच्यावर अन्याय झाल्याची देखील भावना अनेकजण व्यक्त करतात. कुंबळे यांनी देखील 2019 वनडे विश्वचषकात त्याची भारतीय संघात निवड न करणे, ही मोठी चूक असल्याचे म्हटले.
ते म्हणाले,
“आधी जवळपास दीड वर्षापासून तुम्ही त्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून तयार केले होते. मात्र, विश्वचष काय तुम्ही अचानकपणे दुसऱ्या खेळाडूला संधी देता. ही त्यावेळी झालेली मोठी चूक होती.”
या विश्वचषकासाठी रायुडूच्या जागी अष्टपैलू विजय शंकर याला संधी मिळालेली. त्यावेळी निवड समिती अध्यक्ष असलेल्या एमएसके प्रसाद यांनी विजय शंकर थ्रीडी प्लेयर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर रायुडूने आपण विश्वचषक पाहण्यासाठी थ्रीडी गॉगल मागवल्याचे म्हणत तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. काही काळानंतर त्याने हा निर्णय मागे घेतला होता. मात्र, त्याला पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करता आलेच नाही.
त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 55 वनडे सामने खेळताना 1694 धावा केल्या. तर, 6 टी20 मध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या आयपीएल कारकीर्दीचा विचार केल्यास 204 सामन्यात 4332 धावा केल्या
(Anil Kumble Said Dropping Ambati Rayudu From 2019 ODI World Cup Is Blunder)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
WTC फायनलवर पावसाचे सावट! खेळ न झाल्यास असा ठरवला जाणार विजेता
धक्कादायक! इंग्लंड क्रिकेट संघाच्या बस समोर निदर्शने, लॉर्ड्स कसोटीआधी घडला प्रकार