---Advertisement---

धोनीच्या टी२० विश्वचषकातील समावेशाबाबत अनिल कुंबळे म्हणाला…

On: बुधवार, जानेवारी 1, 2020 3:00 PM
---Advertisement---

मागील काही महिन्यांपासून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) पुनरागमनाबद्दल (Comeback) क्रिकेटविश्वात बरेच तर्क- वितर्क लावले जात होते. तसेच, भारताच्या आजी माजी खेळाडूंनीही त्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

परंतु आता भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार अनिल कुंबळेने (Anil Kumble) यावर आपले मत व्यक्त केले आहे. कुंबळेला असे वाटतंय की, यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) धोनीला भारतीय संघात स्थान मिळवणे आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये तो कशाप्रकारे कामगिरी करतो यावर हे अवलंबून आहे.

“धोनीच्या पुनरागमनाबद्दल सर्वात महत्त्वाचे आहे की तो आयपीएलमध्ये कश्याप्रकारे कामगिरी करतो. जर भारतीय संघाला वाटत असेल की त्यांना विश्वचषकात धोनीची आवश्यकता आहे, तर तेव्हा तो भारतीय संघाचा भाग बनू शकतो. परंतु आम्हाला ते पहावे लागेल,” असे क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत कुंबळे म्हणाला.

धोनीने आपल्या भविष्याबद्दल आतापर्यंत काहीही मत व्यक्त केले नाही. त्याने जुलै 2019मध्ये न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकातील उपांत्य फेरीत शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---