इंडियन प्रीमियर लीग आणि आयसीसी टी२० विश्वचषकाच्या आयोजनानंतर एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) स्वतःची टी२० चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करणार असल्याची घोषणा सोमवारी (२ ऑगस्ट) करण्यात आली आहे. या स्पर्धेला प्रीमियर लीग टी२० (पीएल टी २०) असे म्हटले जाणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये सहा संघांमध्ये ही टी२० लीग खेळली जाणार आहे.
सहापैकी किमान दोन संघ आयपीएलमधील संघ असणार आहेत. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या मालकीची कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी आणि दिल्ली कॅपिटल्सची सह-मालकी असलेले संघ या स्पर्धेचा एक भाग असण्याची शक्यता आहे. ईसीबी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी देखील चर्चा करत आहे.
युएईची पहिली प्रीमियर लीग टी२० संयुक्त अरब अमिरातीमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये खेळली जाणार आहे, असे अमिराती क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. सहा संघांच्या शैलीतील स्पर्धेला संयुक्त अरब अमिरातीच्या सहिष्णुता आणि सह-अस्तित्व मंत्रालयाकडून (टोलरेंस आणि को-एक्जिसटेंस मंत्रालय) मंजुरी मिळाली आहे. यानंतरच स्पर्धेबाबत घोषणा करण्यात आली आहे.
पुढे यूएई बोर्डाच्या निवेदनात असे म्हटले गेले आहे की, या नवीन लीगचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात एका संघात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळवले जाणार आहेत. लीगचा हा अनोखा पैलू पाहुण्या खेळाडूंना व्यासपीठ आणि आंतरराष्ट्रीय अनुभव प्रदान करताना जागतिक क्रिकेटमधील काही मोठी नावे आकर्षित करणार आहे.
प्रीमीयर टी२० लीगचे प्रमुख खली अल जरौनी म्हणाले की, “आमचा विश्वास आहे की आम्ही एक लोगो तयार केला आहे. जो यूएईच्या संस्कृतीचा आदर करतो आणि आमचे क्रीडा कौशल्य प्रतिबिंबित करतो. आम्हाला आशा आहे की, हा लोगो जगभरातील क्रिकेट समुदाय, खेळाडू आणि चाहत्यांमध्ये एकत्र येण्याची, उत्साहवर्धक आणि अभिमानाची भावना निर्माण करण्याचा हेतू पूर्ण करेल.”
"UAE's Premier League T20 sets dates & unveils Tournament Logo"
More information 🇦🇪🏏💥 https://t.co/W9HyI1dH0s & more to come….. pic.twitter.com/ulFeGWiKoR
— UAE Cricket Official (@EmiratesCricket) August 2, 2021
यूएईने आधी स्वतःची लीग आयोजित केल्याची चर्चा होती. पण नंतर त्यात फारशी प्रगती झाली नाही. कदाचित आयपीएल संघांच्या मालकांनी स्वारस्य दाखवल्यानंतर या कामाला गती येऊ शकते. वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये आयपीएल मालकांच्या तीन संघांची नावे देखील आहेत. त्यामुळे आता यूएईमध्ये प्रीमीयर लीग टी२० चे कशाप्रकारे आयोजन होईल? हे पाहणे महत्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पक्कच समजा! नॉटिंघम कसोटीत ‘हा’च असणार रोहितचा सलामी जोडीदार, नुकतंच झळकावलंय शतक
काश्मीर प्रीमियर लीग रद्द होण्यासाठी बीसीसीआयचे सर्वतोपरी प्रयत्न! आयसीसीला लिहिले पत्र
पत्नी अनुष्कासाठी विराट बनला फोटोग्राफर, तिनेही किल्लर स्माईल देत कोहलीला केले घायाळ