दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्किया दुखापतीतून परतल्यानंतर आपली ‘जुनी धार’ परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीच्या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर दुखापतीमुळे सहा महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर नोर्कियाने इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात पुनरागमन केले, परंतु त्याच्या गोलंदाजीत ती धार दिसून आली नाही ज्यासाठी तो ओळखला जातो. आयपीएलच्या शेवटच्या हंगामापूर्वी, कागिसो रबाडा आणि नोर्किया ही जोडी या लीगमधील सर्वात धोकादायक जोडी मानली जात होती.
‘मी अजून त्या पातळीवर पोहोचलेलो नाही’
नोर्कियाच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दिल्ली संघाने अनुभवी रबाडाच्या जागी त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याच्या पुनरागमनानंतर त्याचा खेळ तो ज्या स्तरासाठी ओळखला जातो त्या पातळीवर राहिला नाही. नोर्किया गुरुवारी म्हणाला की, “मी अद्याप त्या पातळीपर्यंत पोहोचलेलो नाही. मी अजूनही ते सुधारण्यासाठी काम करत आहे आणि १-२ गोष्टींमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.”
तो म्हणाला की, “गेल्या वर्षीच्या आयपीएल आणि टी२० विश्वचषकातील खेळाच्या पातळीवरून मी स्वतःला न्याय देत आहे आणि त्या पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.” जेव्हा नॉर्केला त्याच्या गोलंदाजीची कमतरता का विचारण्यात आली तेव्हा तो हसला आणि म्हणाला, “मला माहित असते तर मी आतापर्यंत सुधारलो असतो. हे लहान बदलांबद्दल आहे. मी गोष्टी साध्या ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी सध्या काहीतरी काम करत आहे आणि त्याचा निकाल कसा लागतो ते पाहूया.”
२८ वर्षीय वेगवान गोलंदाज म्हणाला की, “मी लय पूर्णपणे गमावली असे नाही. हे लहान सुधारणांबद्दल आहे आणि मला ते दुरुस्त करायचे आहे आणि ते आधीच्या पातळीवर परत यायचे आहे. हे खूप कठीण आहे कारण दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर तुम्ही मर्यादित गोष्टी करू शकता. तुम्ही सलग ८-९ षटके टाकू शकत नाही. हे आव्हानात्मक काळ आहेत आणि यामुळे भविष्यात दुखापतीचा सामना करण्यास मदत होईल.”
दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सध्या सुरू असलेल्या टी२० मालिकेत नॉर्किया चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नाही. मालिकेतील तिसऱ्या सामन्यांत भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने नॉर्कियाच्या एका षटकांत सलग ५ चौकार लगावले होते. त्यामुळे नॉर्कियाला टी२० विश्वचषकाच्या आधी आपला फॉर्म शओधावा लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिकने केली ‘किंग खान’ सारखी एन्ट्री! व्हिडिओ पाहून तु्म्हीही म्हणाल, ‘वाह क्या बात है!’
‘अर्शदीप डेथओव्हर्स मध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो’, आशिष नेहराने टीम इंडियाला दिल्ला मोलाचा सल्ला
आता विदेशी खेळाडूही ‘या’ भारतीयाच्या तालावर नाचणार, आयसीसीने एलीट पॅनलमध्ये केले रिटेन