ऑस्ट्रेलियन दिग्गज अष्टपैलू एलिस पेरी सध्या महिला प्रमीमिय लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी खेळत आहे. महिला आरसीबीची कमान भारतीय दिग्गज स्मृती मंधानाच्या हातात सोपवली गेली आहे. महिलांच्या या लीगमध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक सामने पाहायला मिळाले आहेत. शनिवारी आरसीबीने गुजरात जायंट्सला ज्या पद्धतीने पराभूत केले, त्यानंतर चाहत्यांकडून आरसीबीवर कौतुकाचा वर्षावर होत आहे. असातच एलिस पैरीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पेरी स्मृती मंधानाचे कौतुक करताना दिसते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानात नेहमीच एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच महिला क्रिकेटमध्येही ही बाब तंतोतंत लागू होते. पण ऑस्ट्रेलियाची दिग्गज एलिस पेरी (Ellyse Perry) हिच्या मते स्मृती मंधानाच्या विरोधात खेळम्यापेक्षा तिच्यासोबत खेळणे अधिक चांगले आहे. दरम्यान, डब्ल्यूपीएलच्या या पहिल्या हंगामात एलिस पेरीचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. पेरीने लीगमधील पहिल्या 6 सामन्यांमध्ये 41च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा देखील सामनावेश आहे. शनिवारी पेरी गुजारत जायंट्सविरुद्ध खेळताना 19 धावांसह नाबाद राहिली आणि संघाला विजय मिळवून दिला.
पेरीने नुकतेच म्हटले होते की, ” स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सोबत खेळणे, तिच्याविरोधात खेळण्यापेक्षा चांगलेच आहे. ती एक अनुभवी खेळाडू आहे आणि तिला फलंदाजी करताना पाहून चांगले वाटते. तिच्यासोबत खेळून खुपसाऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळतात.” पेरी आणि मंधानाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल देखील झाला आहे.
https://www.instagram.com/reel/Cp7p_UVoNQD/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, महिला आरसीबीचे डब्ल्यूपीएल 2023मधील प्रदर्शन पाहिले, तर ते समाधानकारक दिसत नाही. लीगमधील पहिल्या पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर आरसीबीने शेवटच्या दोन सामन्यात विजय मिळवला. शनिवारी आरसीबीसाठी सोफी डिवाइनने 99 धावांची जबरदस्त खेळी केल्याने आरसीबीने विजय मिळवला. अवघ्या 33 चेंडूत आणि 275 च्या स्ट्राईक रेटने सोफीने या धावा केल्या. सलामीला आलेली स्मृती 37 धावांचे योगदान देऊ शकली.
(Appreciation of Smriti Mandhana by Ellyse Perry)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एटीके मोहन बागानने उंचावली ISL ट्रॉफी! बेंगलोर एफसी पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत
सोफीने 99धावांवर विकेट गमावताच कट्टर आरसीबी प्रेमिंना आठवला विराट! जाणून घ्या कारण