टोकियो ऑलिंपिक्सच्या सहाव्या दिवशी (२८ जुलै) महिला तिरंदाजीत एकेरी गटात राऊंड ३२ मधील भारत आणि भूतान संघातील महत्त्वाचा सामना पार पडला. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या दीपिका कुमारीने या सामन्यात भूतानच्या कर्माचा ६-० असा सहज पराभव केला आणि आपण अव्वल का आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. तसेच राऊंड १६ मध्ये स्थान मिळवले आहे.
दीपिकाने कर्माला पहिल्या सेटमध्ये २६-२३ ने पराभूत केले. यानंतर दुसऱ्या सेटमध्येही कर्माला आव्हान देत २६- २३ नेच धूळ चारली. यानंतर दीपिकाने आपल्या सर्वोत्तम कौशल्याने तिसरा सेटही २७-२४ने जिंकला. (Archer Deepika Kumari beats Bhutan’s Bhu Karma 6-0 in women’s individual 1/32 Eliminations)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Women's Individual 1/32 Eliminations Results@ImDeepikaK progresses comfortably into the 1/16 Elimination Round after going past Karma of Bhutan. #WayToGo champ!! 👏🙌🏹#RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/Qew3EwBRgr— Team India (@WeAreTeamIndia) July 28, 2021
आता तिचा पुढील सामना आज २.५३ वाजता होणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?