पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीनं महिलांच्या वैयक्तिक गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दीपिका आता शनिवारी संध्याकाळी 5:05 वाजता उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल. दुसरीकडे, भजन कौरला मात्र प्री-क्वार्टर मॅचमध्ये इंडोनेशियाच्या डायंडाकडून पराभव पत्करावा लागला आहे.
दीपिका कुमारीनं जर्मन प्रतिस्पर्धी मिशेल क्रॉपेन हिचा 6-4 असा पराभव केला. दीपिकानं सामन्यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. ती संपूर्ण सामन्यात आत्मविश्वासानं भरलेले वाटत होती. विशेष म्हणजे, मिशेल क्रॉपेन ही दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती आहे.
दीपिका कुमारीनं पहिल्या सेटमध्ये 2 गुण मिळवले. मात्र दुसरा सेट बरोबरीत राहिल्यानं तिला 1 गुण मिळाला. तिसरा सेट जिंकूनं दीपिकानं 5-1 अशी आघाडी घेतली. चौथा सेट जिंकल्यानंतर जर्मन खेळाडूनं स्कोअर 3-2 असा केला. अखेर भारतीय स्टार खेळाडूनं शेवटचा सेट जिंकून विजय मिळवला.
महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीमध्ये भारताच्या भजन कौरला 16व्या फेरीत पराभव पत्करावा लागला. भारतीय तिरंदाजला इंडोनेशियाच्या डायंडा चोइरुनिसाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. शूटऑफमध्ये डायंडानं 9, तर भजननं 8 स्कोर केला, ज्यामुळे ती पिछाडीवर पडली. यासह भजनाचा प्रवास प्री-क्वार्टर फायनलमध्येच संपला, तर डायंडाला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यात यश आलं.
तत्पूर्वी, दुपारी 1 वाजता झालेल्या 25 मीटर पिस्तूल इव्हेंटच्या अंतिम फेरीत स्टार नेमबाज मनू भाकरचं तिसरं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं. मनू या स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिली. मनू भाकरला तिसरं पदक जिंकता आलं नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिनं यापूर्वी 2 पदकं जिंकली आहेत.
हेही वाचा –
भारतासाठी हार्ट ब्रेक…मनू भाकरचं तिसरं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं
भर ऑलिम्पिकमध्ये प्रेम व्यक्त, सुवर्णपदक विजेतीला सर्वांसमोर केलं प्रपोज; सुंदर VIDEO व्हायरल
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!