मॅनचेस्टर। आजपासून (१६ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्ध मॅनचेस्टर येथे खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघाने मोठा निर्णय घेतला आहे. जैव सुरक्षिततेसाठी बनविण्यात आलेल्या नियमांना तोडल्यामुळे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला इंग्लंडने संघातून वगळले आहे.
आर्चर ५ दिवस राहणार आयसोलेशनमध्ये
आर्चरने केलेल्या चुकीसाठी माफी मागितली आहे. तो म्हणाला, “मी जे काही केले, त्यासाठी मी माफी मागतो. मी जे काही केले आहे, त्याने मी केवळ स्वत: लाच नाही तर संपूर्ण संघ आणि व्यवस्थापनालाही संकटात टाकले आहे. मला या चूकीसाठी जी शिक्षा देण्यात आली आहे, त्याचा मी स्विकार करतो, तसेच जैव सुरक्षिततेसाठी बनविण्यात आलेल्या नियमांमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांची माफी मागतो.”
“इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) संघाच्या जैव सुरक्षित वातावरणाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याला आजपासून (१६ जुलै) ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या संघातून वगळण्यात आले आहे,” असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले.
“आर्चरला आता ५ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागेल आणि यादरम्यान त्याच्या कोविड-१९ च्या २ चाचण्या होतील. या २ चाचण्यांमध्ये तो निगेटिव्ह आढळला, तर त्याला आयसोलेशनमधून बाहेर पडता येईल,” असेही त्यांनी पुढे म्हटले.
कसोटी सामन्यातून वगळल्यामुळे आर्चरला झालंय दु:ख
आर्चरने याबरोबरच म्हटले, की त्याला दुसऱ्या कसोटीत खेळायला मिळणार नसल्याचे खूप दु:ख होत आहे.
साऊथँप्टनमध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत आर्चरला काही खास कामगिरी करता आली नव्हती. त्याला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही, तर दुसऱ्या डावात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पहिल्या कसोटीदरम्यान स्लेजिंग करत होता इंग्लंडचा ‘हा’ मोठा खेळाडू, वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा खुलासा
-विराटचा खास मित्र होणार तिसऱ्यांदा बाप; अनुष्काने दिल्या शुभेच्छा!
-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाची पत्नी करतेय न्यायालयात सर्वांची बोलती बंद