मुंबई: 2017 च्या एमएसएलटीए वार्षिक मानांकन यादीत राज्यात ऋतुजा चाफळकर यांसह भारताचा पुरुष गटातील क्र.5 खेळाडू अर्जुन कढे, भारताची क्र.4 महिला खेळाडू ऋतुजा भोसले, भारताचा कुमार गटातील अव्वल खेळाडू सिध्दांत बांठिया या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला.
मिहिका यादव, आर्यन भाटिया, प्रेरणा विचारे, अर्जुन गोहड, मानस धामणे, नील जोगळेकर, मधुरिमा सावंत, अस्मि आडकर या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेची 2017ची वार्षिक मानांकन यादी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी आज जाहिर केली.
अनेक स्पर्धांमुळे खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होत असून राष्ट्रीय पातळीवर आपले मानांकनात आगेकुच करण्याचीदेखील संधी मिळत असल्याचे अय्यर यांनी नमुद केले.
पुणे विभांगातून यावर्षीच्या 2017च्या यादीत अर्जुन कढे(पुरुष एकेरी), ऋतुजा भोसले(महिला एकेरी),सिध्दांत बांठिया(18वर्षाखालील मुले),ऋतुजा चाफळकर(14वर्षाखालील मुली), अर्जुन गोहड (14वर्षाखालील मुले), मधुरिमा सावंत(12वर्षाखालील मुली), मानस धामणे(12वर्षाखालील मुले), नील जोगळेकर( 10 वर्षाखालील मुले) आणि अस्मि आडकर(10 वर्षाखालील मुली) या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.
मुंबई विभांगातून मिहिका यादव(18वर्षाखालील मुली), आर्यन भाटिया(16 वर्षाखालील मुले), प्रेरणा विचारे(16 वर्षाखालील मुली) यांनी अव्वल क्रमांक मिळवला.
2017मध्ये एआयटीए कॅलेंडरमधील इतर राज्यांच्या तुलनेत एमएसएलटीए तर्फे 150हून अधिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 10आंतरराष्ट्रीय स्पर्धा, 93 एआयटीए मानांकन स्पर्धा(12,14,16वर्षाखालील 3राष्ट्रीय मानांकन, 5नॅशनल सिरीज, 4सुपर सिरीज, 46चँपियनशीप सिरीज, 19टॅलेंट सिरीज), 7 पुरूष व महिला राष्ट्रीय मानांकन, 32 राज्य(10वर्षाखालील)मानांकन स्पर्धांसह 4 प्रौढ आणि आंतर क्लब अजिंक्यपद स्पर्धा, जुनिअर टेनिस लीग, राज्यस्तरावर रोड टू एमएसएलटीए स्पर्धांचा समावेश आहे.
मुंबई विभागांत 52स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 1आंतरराष्ट्रीय स्पर्धा, पुणे विभागात 19 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 6आंतरराष्ट्रीय स्पर्धा, कोल्हापुर विभागात 23 स्पर्धा, नवी मुंबई विभागात 6 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 1 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, नागपुर विभागात 8 स्पर्धा, औरंगाबाद विभागात 11स्पर्धा, सोलापुर विभागात 3स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून 1आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि नाशिक विभागात 8स्पर्धांचा समावेश आहे.
प्रत्येक गटातील अव्वल तीन खेळाडूंचा एमएसएलटीए तर्फे मुंबई येथे मे महिन्यात सत्कार करण्यात येणार असल्याचे अय्यर यांनी सांगितले.
*खेळाडूंची वार्षिक मानांकन यादी खालीलप्रमाणेः
10 वर्षाखालील मुले: 1. नील जोगळेकर(पुणे), 2. अर्णव पापरकर(पुणे), 3. समर्थ सहिता(मुंबई), 4. वेदांत भसीन(मुंबई), 5. ईशान मेरू(सोलापूर), 6. राघव अमीन(पुणे), 7. साहिल कोठारी(मुंबई), 8. जीवन नादर(ठाणे);
10 वर्षाखालील मुली: 1. अस्मि आडकर(पुणे), 2. ओमी मेहता(नवी मुंबई), 3. आकांक्षा अग्निहोत्री(पुणे), 4. आनंदी भुतडा(नवी मुंबई), 5. उर्वी काटे(मुंबई), 6. नैनिका रेड्डी(सोलापूर), 7. सिया प्रसादे (पुणे), 8. ऐश्वर्या जाधव(कोल्हापूर);
12 वर्षाखालील मुले: 1. मानस धामणे(पुणे), 2. प्रज्वल तिवारी(मुंबई), 3. काहीर वारिक(मुंबई), 4. जोशुआ ईपन(नवी मुंबई), 5. जैष्णव शिंदे(नाशिक), 6. अर्णव ओरुगंती (पुणे), 7. ऋषिकेश अय्यर(मुंबई), 8. अंशुल सातव (पुणे);
12 वर्षाखालील मुली:1. मधुरिमा सावंत(पुणे), 2. परी सिंग(पुणे), 3.अन्या जेकब(पुणे), 4. ख़ुशी शर्मा(पुणे), 5. सोनल पाटील(कोल्हापूर), 6. श्रावणी खवळे (पुणे), 7. सायना देशपांडे(पुणे), 8. समीक्षा श्रॉफ(पुणे);
14वर्षाखालील मुले: 1. अर्जुन गोहाड(पुणे), 2. गिरीश चौगुले(पुणे), 3. फैज नस्याम (मुंबई), 4. यशराज दळवी(पुणे), 5. सन्मय गांधी(पुणे), 6. मोहम्मद खान(मुंबई), 7. लेस्टन वाझ(मुंबई), 8. वर्धन कारकल(पुणे);
14 वर्षाखालील मुली: 1. ऋतुजा चाफळकर(पुणे), 2. सुदिप्ता कुमार(मुंबई), 3.मल्लिका मराठे(पुणे), 4. गार्गी पवार(पुणे), 5. हृदया शहा (पुणे), 6. भूमिका त्रिपाठी(मुंबई), 7. रिया वाशीमकर(पुणे), 8. वैष्णवी आडकर(पुणे);
16 वर्षाखालील मुले: 1.आर्यन भाटिया(मुंबई), 2. आदित्य बलसेकर(मुंबई), 3. तेजस्वी मेहरा(नवी मुंबई), 4. सर्वेश बिरमाने (पुणे), 5. गिरीश चौगुले(पुणे), 6. अर्का गांगुली(पुणे), 7. प्रथम भुजबळ(पुणे), 8. सिद्धार्थ जडली(पुणे);
16 वर्षाखालील मुली: 1. प्रेरणा विचारे (मुंबई), 2. सालसा आहेर(पुणे), 3. रिचा चौगुले(पुणे), 4. सान्या सिंग(पुणे), 5. बेला ताम्हणकर(पुणे), 6. गौरी भागिया(मुंबई), 7. गार्गी पवार(पुणे), 8. मल्लिका मराठे(पुणे);
18 वर्षाखालील मुले: 1. सिद्धांत बांठिया(पुणे), 2. ध्रुव सुनीश(पुणे), 3. अथर्व शर्मा(पुणे), 4. करण श्रीवास्तव, 5. कैवल्य कलामसे(नांदेड), 6. गुंजन जाधव(नवी मुंबई), 7. पियुष सालेकर(पुणे), 8. अभिषेक शुक्ला(नाशिक);
18 वर्षाखालील मुली: 1. मिहिका यादव(पुणे), 2. सालसा आहेर(पुणे), 3. प्रेरणा विचारे(मुंबई), 4. शिवानी इंगळे(पुणे), 5. मल्लिका मराठे(पुणे), 6. बेला ताम्हणकर(पुणे), 7. गौरी भागिया(मुंबई), 8. आलिया इब्राहीम(मुंबई);
पुरुष गट: 1. अर्जुन कढे (पुणे), 2. आर्यन गोवीस(मुंबई), 3. जयेश पुंगलिया (पुणे);
महिला गट: 1. ऋतुजा भोसले (पुणे), 2. कनिका वैद्य(मुंबई), 3. स्नेहल माने(पुणे)