अखेर रणजी ट्रॉफी 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केले. मागच्या मोठ्या काळापासून मुंबई रणजी संघाकडून त्याला पदार्पणाची संधी मिळत नव्हती. पण या हंगामात गोवा संघाकडून त्याने रणजी पदार्पण केले. गोवा संघासाठी पहिला रणजी सामना खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने शतकीय खेळी केली. या शतकीय खेळीनंतर अर्जुनचे सर्वत्र कौतुक होत आहे. शतक केल्यानंतर आता पहिल्यांदाच त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शतक केल्यानंतर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितल्यानुसार स्वतःमधील क्षमता अर्जुनला आधीपासूनच माहीत होती. माध्यमांशी बोलताना अर्जुन म्हणाला की, “मला नेहमीच माझ्या क्षमतेवर विश्वास होता आणि मला माहीत होते की, जर मी एकदा खेळपट्टीवर टीकलो, तर मोठी खेळी करू शकतो. मला फक्त पहिला एक तास सांभाळून खेळायचे होते आणि नंतर माझा डाव पुढे घेऊन जायचा होता.”
“जेव्हा मी खेळपट्टीवर आलो होतो, तेव्हा माझे काम एकच होते की, जास्तीत जास्त चेंडूंना समोरे जायचे होते. कारण त्यावेळी सुयश 80 धावा करून खेळपट्टीवर खेळत होता. माझं काम त्याला प्रोटेक्ट करण्याचं होतं. तसेच दुसऱ्या दिवशी माझे काम हेच होते की, पहिला एक तास जपून खेळायचं आणि नंतर धावा करायच्या,” असेही अर्जुन पुढे बोलताना म्हणाला.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अर्जुनेच प्रदर्शन –
दरम्यान, अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणाच्या या सामन्यात गोवा संघासाठी 207 चेंडूत 120 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 16 चौकार आणि 2 षटकार निघाले. अर्जुनचे वडील आणि भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने देखील स्वतःच्या रणजी कारकिर्दीची सुरुवात शतकीय खेळी करूनच केली होती. सचिनने 1988-89 मध्ये स्वतःच्या पदार्पणाच्या सामन्यात 129 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. (Arjun Tendulkar’s special reaction after scoring a century in his debut Ranji match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार स्टोक्सवर प्रशिक्षक मॅक्युलम भारी! सिक्स हिटिंग चॅलेंजमध्ये दाखवून दिली पॉवर
VIDEO: विराटने सोडला सोपा कॅच, पुढे रिषभ पंतने जे केले ‘ते’ चकीत करणारे