इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये पंजाब किंग्जचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वांना प्रभावित केले. चालू हंगामातील त्याचे प्रदर्शन पाहून पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला भारतीय संघात निवडले गेले आहे. भारताच्या १८ सदस्यीय संघात निवड झाल्यानंतर चाहत्यांना त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच अर्शदीपने एक खास प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकी यांच्यात पुढच्या महिन्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. आयपीएल हंगाम संपल्यानंतर मायदेशात ही मालिका सुरू होईल. या मालिकासाठी भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झाल्यामुळे अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) उत्सुक आहे. तो म्हणाला की, “मी भारतीय संघात निवडलो गेल्यामुळे खूप आभारी आहे आणि नशीबवान देखील आहे. मी माझे सर्वोत्तम प्रदर्शन कायम ठेवेल. माझे लक्ष्य आहे की, जेव्हा संघाला गरज असेल, तेव्हा विकेट घ्यावी. आपल्या देशासाठी खेळण्याची आणि पदार्पणाची वाट पाहत आहे. मला अपेक्षा आहे की, मी भारतीय संघासाठी काही उत्कृष्ट आकड्यांसह माझी छाप सोडेल.”
दक्षिण आफ्रिकी दिग्गज कागिसो रबाडासोबत आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली, याविषयी बोलताना अर्शदीप म्हणाला की, “त्यांच्यासोबत खेळण्याचा मी आनंद घेतला. मला वरिष्ठ खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करून मजा आली. मला रबाडा आणि मोहम्मद शमीकडून खूप मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे खूप मदत झाली.”
“कोणत्याही संघासाठी खेळणे आणि चांगले प्रदर्शन करणे हे लक्ष्य असते. कोणीही या अपेक्षेसह खेळत नाही की, त्याला भारतीय संघाकडून आमंत्रण येईल. कारण, आम्हाला ज्या संघाकडून संधी मिळते, आम्ही त्या संघासाठी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या हातात ज्या काही गोष्टी आहेत, मी त्याच्या जोरावर प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतो,” असे रबाडा पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, आयपीएल २०२२मध्ये अर्शदीपचे आकडे म्हणावे तेवढे चांगले नाहीत, पण अंतिम षटकांमध्ये त्याने प्रभावित केले. हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या असल्या, तरी शेवटच्या षटकांमध्ये ७.५८च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या आहेत. त्याचे हे प्रदर्शन पाहून भारतीय संघाचे निवडकर्ते प्रभावित झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी पहिल्यांदा भारतीय संघात निवडले गेले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: फक्त एक स्टंप दिसत असतानाही गोलंदाजाने उडवल्या बेल्स; थ्रो पाहून सर्वजण हैराण
पराभवानंतर काय विचार करतोय KL Rahul, सोशल मीडियावर शेअर केली आश्चर्यचकित करणारी पोस्ट