भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना गुरुवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील पहिला टी-20 सामना भारताने अवघ्या दोन धावांच्या अंतराने जिंकला. मालिकेतील हा दुसरा सामना निर्णायक असून भारताकडे मालिका नावावर करण्याची संधी होती. पण या महत्वाच्या सामन्यात अर्शदीप सिंग याने एका षटकात तीन नो बॉल टाकण्याची चूक करून बसला.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंका संघाने पहिल्या षटकात अवघ्या दोन धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या षटकात श्रीलंकन संघ 21 धावांपर्यंत पोहोचला. कारण ठरले अर्शदीप सिंग (Arshdeep Singh ) याने टाकलेले सलग तीन नो बॉल. श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्या षटकात अर्शदीप गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर श्रीलंका संघ पाच धावा करू शकला. पण शेवटचा एक चेंडू राहिला असताना अर्शदीपने लागोपाठ तीन नो बॉल टाकले. पहिल्या नो बॉलवर श्रीलंकन सलामीवीर कुलस मेंडिस एकही धाव घेऊ शकला नाही. पण दुसऱ्या नॉ बॉलवर त्याने चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या नो बॉलवर मेंडिसने षटकार मारला आणि संघाची धावसंख्या 21 पर्यंत नेली.
अर्शदीपचे हे षटक भारतासाठी महागात पडलेच, पण त्याने एक यादरम्यान नकोसा विक्रम देखील नावावर केला. अर्शदीप भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वात जास्त तीन नो बॉल टाकले आहेत. यापूर्वी देखील हा विक्रम अर्शदीपच्याच नावावर होता. जेव्हा मागच्या वर्षी हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात एका षटकात दोन नो बॉल टाकले होते. अर्शदीपने श्रीलंकेविरुद्धच्या गुरुवारी खेळाता नॉ बॉलची हॅट्रिक केली, असेही म्हणता येऊ शकते.
अर्शदीपचा आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त मोठी नाहीये. पण तरीही भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वात जास्त 12 नो बॉल (74.1 षटकात) मात्र त्याच्याच नावावर आहेत. नो बॉलसह अर्शदीप या यादीत आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) याने टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 8 नो बॉल (213.5 षटके) टाकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal ) आहे. चहलने टी-20 कारकिर्दीत टाकलेल्या 267 षटकांमध्ये 5 नो बॉल टाकले आहेत. (Arshdeep Singh has bowled the most no balls in his short T20 career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रतिक्षा संपली! राहुल त्रिपाठी करणार भारतासाठी पदार्पण, ‘अशी’ आहे प्लेइंग इलेव्हन
हार्दिकचा ऍटिट्यूड संघासाठी घातक! माजी दिग्गजाची कर्णधाराविषयी मोठी प्रतिक्रिया