सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चीनमधील हॅंगझू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आले आहे. या संघात सर्वच खेळाडू युवा असून, बीसीसीआयने भविष्याचा विचार करून हा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या संघात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची निवड झाली आहे. मात्र, यामुळे विश्वचषकात खेळण्याची त्याची संधी हुकू शकते असे बोलले जाते.
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमध्ये एशियन गेम्समध्ये क्रिकेटचे सामने खेळले जाते. तर, विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या संघातील खेळाडू विश्वचषकात खेळणे कठीण दिसते.
अशात अर्शदीप एशियन गेम्स खेळणार असल्याने तो विश्वचषकात खेळण्याची शक्यता कमी आहे. विश्वचषकात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतो. यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज हे प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. तर, शार्दुल ठाकूर वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून भूमिका बजावू शकतो. अशा परिस्थितीत अर्शदीप याला संघातून बाहेर बसावे लागू शकते.
भारतीय संघाने 2011 वनडे विश्वचषकात चार वेगवान गोलंदाजांसह उतरण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये जहीर खान, श्रीसंत, आशिष नेहरा व मुनाफ पटेल यांचा समावेश होता. यापैकी जहीर व नेहरा हे डावखुरे गोलंदाज होते. त्यामुळे भारतातील परिस्थितीत अर्शदीप हा भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरला असता.
(Arshdeep Singh Might Miss ODI World Cup Due To Asian Games Selection)
महत्वाच्या बातम्या –
‘या’ खेळाडूला शक्य तिथे संधी द्याच! अनिल कुंबळेंचा भारतीय संघाला मोलाचा सल्ला
टीम इंडियाचा कर्णधार बनताच आली ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “गळ्यात सुवर्णपदक घालून…”