---Advertisement---

‘जोपर्यंत मी चांगली फलंदाजी करतोय, तोपर्यंत चिंता नाही’, १०० वा कसोटी खेळणाऱ्या विराटची प्रतिक्रिया

On: शनिवार, मार्च 5, 2022 5:45 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND vs SL Test Series) यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना मोहालिमध्ये खेळला जात आहे. विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. कारण हा सामना विराटच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना होता. असे असले तरी, विराट पहिल्या डावात ४५ धावा करून बाद झाला आणि याविषयी त्याला चिंता वाटत नसल्याचेही त्याने सांगितले. त्याच्या मते तो सध्या चांगला प्रकारे खेळत आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांनी जेव्हा विराटला विचारले की, मोठी खेळी करता आली नसल्यामुळे तो काही बदल करणार आहे का ? यावर उत्तर देताना विराटने सांगितले की, “माझी तयारी तशीच राहील, जशी नेहमी राहिली आहे. जोपर्यंत मी चांगली फलंदाजी करत आहे, तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही. आपण नेहमी विक्रम आणि यश याबद्दल उत्सुक असतो.”

कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असल्यामुळे विराटला सुरुवातीला अस्वस्थ वाटत होते. तो पुढे म्हणाला की, “मला वाटले, जसे की ही माझी पहिली कसोटी आहे. मला अस्वस्थ वाटत होते आणि खूप चिंताग्रस्तही होतो.”

विराटने या सामन्यात स्वतःच्या डावाची सुरुवात चांगल्या प्रकारे केली, पण मोठी खेळी करू शकला नाही. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “माझी सुरुवात चांगली होती आणि अशाप्रकारे बाद झाल्यामुळे वाईट वाटत आहे. मी चांगली फलंदाजी करत होतो. असे बाद झाल्यावर फलंदाजाच्या रूपात निराशा होते. आपला प्रयत्न नेहमी मोठी खेळी करून संघाला भक्कम स्थितीत पोहोचवण्याचा असतो.”

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेतील या सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघ सध्या फलंदाजी करत आहे. पहिल्या दिवसाच्या सुरुवातील कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ६ विकेट्सच्या नुकसानावर ३९७ धावा केल्या आहेत. यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सर्वात मोठी ९६ धावांची खेळी केली आणि विकेट गमावली. तसेच हनुमा विहारीनेही (५८) अर्धशतकी खेळी केली.

महत्वाच्या बातम्या –

आयएसएल: जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, ओदिशा एफसीने पराभवाने घेतला निरोप

“शंभराव्या कसोटीची कॅप माझ्या बालपणीच्या हिरोकडून मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट”

फिरकीचा जादूगार गेला! आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---