भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. यानंतर संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआय गुरुवारी या दौऱ्यासाठी संघाची घोषणा करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी 45 खेळाडूंची निवड केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने 45 खेळाडूंच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळले जातील. ही मालिका 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
या मालिकेतही अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) विश्रांती घेऊ शकतो. वृत्तानुसार, कोहलीने वनडे आणि टी20 मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतच स्थान देऊ शकते. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) कसोटीत पुनरागमन करू शकतात. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत राहुल आणि अय्यर देखील भारतीय संघाचा भाग होते. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ केएल राहुलला टी20 संघाचा कर्णधार बनवू शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी20 सामना 10 डिसेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा टी20 सामना 12 डिसेंबरला खेळवला जाईल. तिसरा टी20 सामना 14 डिसेंबरला होणार आहे. 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. हा सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 19 डिसेंबरला तर तिसरा सामना 21 डिसेंबरला होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून तर दुसरा सामना 3 जानेवारीपासून होणार आहे. (As many as 45 players who will travel from India for South Africa tour BCCI applied for visa)
महत्वाच्या बातम्या
‘आता परिणाम भोगा…’, 24 वर्षीय गिलच्या हाती कर्णधारपदाची सूत्रे देताच डिविलियर्सची गुजरातला चेतावणी
टी20 वर्ल्डकपसाठीचे 20 संघ फायनल! यांना मिळाले तिकिट, तर यांचा झाला हिरमोड