---Advertisement---

लय भारी! वेगाने धावा काढणाऱ्या मार्शचा बेअरस्टोने ‘असा’ काढला काटा, अविश्वसनीय कॅच तुम्हीही पाहाच

Jonny-Bairstow
---Advertisement---

मागील काही दिवसांपासून इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो भलताच चर्चेत आहे. ऍशेस 2023 मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बेअरस्टो वादग्रस्त पद्धतीने बाद झाल्यामुळे चर्चेत आला होता. तसेच, सामन्यात आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला उचलून मैदानाबाहेर नेण्यामुळे चर्चेत होता. अशात तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी त्याचे चर्चेत येण्यामागील कारण त्याचे शानदार क्षेत्ररक्षण आहे. यादरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बुधवारपासून (दि. 19 जुलै) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील चौथ्या ऍशेस कसोटी (Ashes Test) सामन्याला सुरुवात झाली. यादरम्यान जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने शानदार क्षेत्ररक्षणाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. हे सर्व ऑस्ट्रेलियाच्या डावातील 63व्या षटकात पाहायला मिळाले.

डाईव्ह मारत एक हाताने पकडला झेल
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) चांगल्या लयीत होता. तो 59 चेंडूंचा सामना करत 51 धावांवर खेळत होता. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचाही समावेश होता. या धावा त्याने कठीण काळात काढत धावफलक हलता ठेवत होता. मात्र, 63वे षटक टाकत असलेल्या ख्रिस वोक्स (Chris Woakes) याचा पाचवा चेंडू मार्शने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन मागे उडाला.

यावेळी चेंडू आपल्याकडे येताना पाहून बेअरस्टो याने उजव्या हातावर डाईव्ह मारली आणि एक हाताने झेल घेतला. त्याचा हा झेल पाहून क्रिकेटप्रेमीदेखील हैराण झाले. हा झेल घेताच इंग्लंड संघ आनंदी झाला, तर प्रेक्षकांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.

https://twitter.com/englandcricket/status/1681697174499860485

ख्रिस वोक्सची शानदार गोलंदाजी
मार्शची विकेट घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 7 विकेट्स गमावत 255 इतकी होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स गमावत 299 धावा केल्या. आतापर्यंत ख्रिस वोक्स याने शानदार गोलंदाज केली. त्याने यादरम्यान 19 षटके गोलंदाजी करताना 54 धावा खर्च करत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, स्टुअर्ट ब्रॉड याने 2, मार्क वूड आणि मोईन अली यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. (ashes 2023 jonny bairstow takes brilliant one handed catch see video)

महत्त्वाच्या बातम्या-
आता विरोधकांची खैर नाही! अखेर एक वर्षानंतर फिट होऊन संघात परतला ‘हा’ पठ्ठ्या, कर्णधाराचं टेन्शनही दूर
‘माही’चा हुकमी एक्का आख्ख्या पाकिस्तानवर पडला भारी, कट्टर प्रतिस्पर्ध्याला 205 धावांवर केले गार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---