ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (australia vs england) यांच्यात सध्या ऍशेस मालिका (ashes series) खेळली जात आहे. इंग्लंड संघासाठी ऍशेस मालिकेची सुरुवात निराशाजनक राहिली. ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्स राखून विजय मिळवला होता. आता उभय संघात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने त्यांचा १२ सदस्यीय संघ घोषित केला आहे.
उभय संघातील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता इंग्लंडला ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्यासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणे आवश्यक असणार आहे. दुसरा कसोटी सामना एडिलेडमध्ये १६ डिसेंबर (गुरुवार) पासून खेळला जाईल. मालिकेतील हा दुसरा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा असेल.
इंग्लंड संघाचे दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart broad) हे दोघे पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांतीवर होते. पहिल्या सामन्यादरम्यान या दोघांनी मैदानावरील खेळाडूंना पाणी पाजण्याचे काम केले होते. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. अशात दुसऱ्या सामन्यापूर्वी त्यांना १२ सदस्यीय संघात सामील केले गेले आहे. इंग्लंड संघ सामन्याच्या दिवशी नाणेफेक करण्याच्यावेळी त्यांच्या प्लेइंग इलेव्हानची घोषणा करेल.
चाहत्यांची इच्छा आहे की या दोन्ही वेगवान गोलंदाजांना दुसऱ्या सामन्यात एकत्र संधी मिळावी. जर दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला संधी मिळाली, तर हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १५० वा सामना ठरेल. जेम्स अँडरसनचा विचार केला, तर त्याने यापूर्वीच जाहीर केला होते की तो या दौऱ्यात पाच कसोटी सामने खेळण्याच्या हिशोबाने आला आहे. अँडरसनला पहिल्या सामन्यात विश्रांती दिली गेली होती. आता तो पुढच्या चार सामन्यांसाठी उपस्थित असेल याची पूर्ण शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त इंग्लंड संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच याला देखील १२ सदस्यीय संघात सामील केले गेले आहे.
दुसऱ्या ऍशेस सामन्यासाठी इंग्लंडने घोषित केलेला १२ सदस्यीय संघ –
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, हसीब हमीद, जॅक लीच, डेविड मलान, ऑली पॉप, ऑली रॉबिंसन, बेन स्टोक्स और क्रिस वॉक्स.
महत्वाच्या बातम्या –
पत्रकार परिषदेत विराटचे ५ मुद्यांवर परखड भाष्य, आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी ‘किंग कोहली’ उपलब्ध
ऍडीलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन जाहीर; मात्र, प्रमुख गोलंदाज संघाबाहेर
‘सर’ जडेजा घेणार कसोटीतून निवृत्ती? कारण आहे अचंबित करणारे