पुणे, १४ ऑक्टोबर २०२३: सायकलिंग असोसिएसन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने व क्रीडा प्रबोधिनी माजी सायकलिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने दुसऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या दिवशी आशिष पवार, समरजीत थोरबोले, आकांक्षा म्हेत्रे, वेदांत जाधव आणि झायना पिरखान यांनी आपापल्या वयोगटात सुवर्णपदक पटकावले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील राज्य शासनाच्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलामधील सायकलिंग व्हेलोड्रमवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली. युथ बॉईज ५०० मीटर्स टायम ट्रायल प्रकारात पुण्याच्या आशिष पवारने(३९.८६ सेकंद) वेळ नोंदववत प्रथम क्रमांक पटकावला. तर संस्कार घोरपडे (पुणे ४२.०१ सेकंद) व अनुभव पवार (पुणे ४९.०८ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा उदघाटन समारंभ पोलीस अधिकारी श्री शत्रुघ्न माळी यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी सायकलिंग फेडरेषन ऑप इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, मुख्य पंच सुभाष पोवळे, अनिल तांबे, शिवछत्रपती पारितोषीक सन्मानीत उत्तम नाळे, मिलींद झोडगे, दिपाली निकम आदी मान्यवर हजर होते. या स्पर्धेमधून रांची येथे होणा-या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात येणार आहे. (Ashish, Samarjeet, Akanksha, Vedant and Zaina win gold in 2nd State Track Cycling Championship)
आजचे निकाल पुढील प्रमाणे-
(१) युथ बॉईज ५०० मीटर्स टायम ट्रायल- पहिला- आशिष पवार (पुणे क्रीडा प्रबोधिनी ३९.८६ सेकंद), दुसरा- संस्कार घोरपडे (पुणे ४२.०१ सेकंद), तिसरा – अनुभव पवार (पुणे ४९.०८ सेकंद),
(२) सब ज्युनिअर बॉईज ५०० मीटर्स टाईम ट्रायल – पहिला- समरजीत थोरबोले (क्रीड प्रबोधिनी, पुणे ३९.१९), दुसरा – नमन शर्मा (पुणे ३९.२२ सेकंद) तिसरा हरीश डोबाळे (क्रीडा प्रबोधिनी, पुणे ३९.३१ सेकंद),
(३) सब ज्युनिअर गर्ल्स – पहिली – आकांक्षा म्हेत्रे (जळगांव ४१.८९ सेकंद), दुसरी – आभा सोमण (रायगड ४३.०२ सेकंद), तिसरी – गायत्री तांबवेकर (पुणे ४३.१० सेकंद),
(४) मेन ज्युनिअर १ किमी टायम ट्रायल – पहिला – वेदांत जाधव (पुणे १ मि १३.०७ सेकंद) दुसरा- साहील शेटे (पुणे १ मी १३.१७ सेकंद) तिसरा – मंथन लाटे (ठाणे १ मी १६.१५ सेकंद),
(५) वुमेन ज्युनिअर ५०० मीटर टायम ट्रायल – पहिली – झायना पिरखान (पालघर ४१.४९ सेकंद), दुसरी – आकांक्षा म्हेत्रे (जळगांव ४२.१६ सेकंद), तिसरी- सायली आरंडे (कोल्हापूर ४२.७७ सेकंद),
महत्वाच्या बातम्या –
अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्याचे संघ जाहीर, सायली जाधव, विक्रम कदम करणार नेतृत्व
अफगाणिस्तानच्या तुफानी सुरुवातीनंतर इंग्लंडचे कमबॅक, गुरबाजने केला कहर